मुंबई, 6 मार्च : क्रिकेट विश्वात Mr. 360 नावाने प्रसिद्ध असलेला स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादवचा सुप्ला शॉट्स क्रिकेट रसिकांमध्ये बराच लोकप्रिय आहे. सध्या सूर्यकुमार यादव हा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत भारतीय संघाचा भाग असून त्याला पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून याआधी सूर्यकुमारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मध्ये सूर्या मुंबईतील रस्त्यांवर तरुणांसोबत क्रिकेट खेळताना दिसतोय. तरुणांच्या खास फर्माइशवर सूर्याने यावेळी त्याचा लोकप्रिय असा सुप्ला शॉट खेळला. सूर्यकुमार यादव हा स्वतः मुंबईचा राहणारा असून तो लहानपणी मित्रांसोबत अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर क्रिकेट खेळला आहे. सूर्याने पुन्हा मुंबईच्या रस्त्यांवर क्रिकेट खेळून जुन्या आठवणी जागवल्या.