
रत्नागिरी- फिनोलेक्स इंडस्ट्रीज गेली 30 वर्ष रत्नागिरी मध्ये कार्यरत असून अनेक सामाजिक उपक्रमांना मदत करत आहे. यामध्ये पर्यावरण, आरोग्य ,शिक्षण, सामाजिक बांधिलकी, स्वच्छता, अशा गोष्टींमध्ये कार्यरत आहेत. फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन चे हे सर्व उपक्रम स्वर्गीय संस्थापक श्री. प्रल्हाद छाब्रिया यांच्या दूरदृष्टीतून चालू आहेत,त्यांचे आज ५ मे रोजी पुण्यस्मरण आहे.
फिनोलेक्स इंडस्ट्रीजने १३ वर्षांपूर्वी मुकुल माधव विद्यालयाची स्थापना करून ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी माध्यमातून माफक शुल्कात शिक्षणाची उत्तम सोय केली आहे. मुकुल माधव विद्यालयामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमा बरोबरच तबला, गायन, कराटे, बुद्धिबळ, योगा, यांसारखे अभ्यासेतर वर्ग मोफत घेतले जातात. यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकास होतो. मुकुल माधव विद्यालययाचा दरवर्षी शालांत परीक्षेमध्ये १०० टक्के निकाल लागत आहे.
मुकुल माधव विद्यालयाने परिसरात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अनेक पावले उचलली आहेत. त्यामध्ये शाळेच्या क्षेत्रात वृक्षारोपण, रेन वॉटर हार्वेस्टिंग व सौर ऊर्जा प्रकल्पाची स्थापना करून पर्यावरण पूरक शाळा होण्याच्या मार्गाने वाटचाल सुरू केली आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंग मुळे पावसाळ्यात अनावश्यक वाहून जाणारे पाणी शुद्धीकरण करून जमिनीमध्ये साठवले जात असल्यामुळे या परिसरातील भूजल पातळ्यांमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे तसेच सौरऊर्जा प्रकल्पामुळे देखील विजनिर्मिती पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करून शाळेला पुरवली जाणार आहे या सर्व उपक्रमासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे आर्थिक सहाय्य लाभले आहे.