मुंबई : बातमी मेगा ब्लॉकची. मध्य आणि हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी यादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. या ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा विरार ते वसई रोड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार, 5 मार्च 2023 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
ठाणे-कल्याण पाचवी आणि सहावी लाईन सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
अप मेल आणि डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायवर्जन
12126 पुणे– मुंबई प्रगती एक्स्प्रेस कर्जत-कल्याण मार्गे वळवली जाईल आणि निर्धारित वेळेच्या 10-15 मिनिटं उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
सर्व अप आणि डाऊन मेल एक्सप्रेस अनुक्रमे अप फास्ट लाईन आणि डाऊन फास्ट लाईनवर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 10 ते 15 मिनिटं उशिराने पोहोचतील.
विशेष सेवा
वसई रोड येथून सकाळी 9.50 वाजता दिवा साठी सुटणारी मेमू कोपर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
दिवा येथून सकाळी 11.30 वाजता वसई रोडला जाणारी मेमू दिवा ऐवजी कोपर येथून (शॉर्ट ओरीजनेट) सकाळी 11.45 वाजता सुटेल.
कुर्ला – वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला आणि पनवेल – वाशी या भागांत विशेष लोकल चालवण्यात येतील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.
जाहिरात :