
गौतम अदानी यांनी एकाच फटक्यात, भारतविरोधी चीन आणि तुर्कीचा करेक्ट कार्यक्रम लावला. या दोन्ही देशांना धडा शिकवला. राष्ट्र प्रथम नंतर व्यवसाय, व्यापार हे नवीन तत्व पुण्यातील सफरचंद व्यापार्यांनी घालून दिले. त्याचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पण दिसून येत आहे.
गौतम अदानी यांनी एकाच दगडात मारले दोन पक्षी; तुर्की आणि चीनचा करेक्ट कार्यक्रम..
भारत आणि पाकिस्तान तणावात पाकिस्तानची मदत करणाऱ्या तुर्कस्तानला भारतीय, त्यांच्या कंपन्यांकडून एका मागून एक झटके बसत आहेत.? अगोदर सरकारने आणि आता देशातील सर्वच नागरिकांनी तुर्की आणि अझरबैजानचा बॉयकॉट सुरू केला आहे. राष्ट्र प्रथम नंतर व्यवसाय, व्यापार हे नवीन तत्व पुण्यातील सफरचंद व्यापार्यांनी घालून दिले. त्याचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पण दिसून येत आहे. गौतम अदानी यांनी सुद्धा हाच मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी एका फटक्यात भारतविरोधी चीन आणि तुर्कीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.
अदानी समूहाचा मोठा निर्णय…
अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी भारतविरोधी चीन आणि तुर्कीला करारा जबाब दिला आहे. अदानी समूहाची कंपनी अदानी एअरपोर्ट होल्डिंगने मोठा निर्णय घेतला आहे. अहमदाबाद विमानतळावरील ग्राऊंड हँडलिंग सेवांसाठी तुर्कीच्या सेलेबी (Celebi) कंपनीसोबतची भागीदारी संपवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ही सर्व व्यवस्था आता अदानी समूह स्वतः हाताळण्याची शक्यता आहे. अथवा नवीन भागीदार शोधला जाऊ शकतो.
भारतीय नागरी उड्डयन मंत्रालया अंतर्गत येणार्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी या संस्थेने सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांची सुरक्षा मंजूरी रद्द करण्याच निर्णय घेतला. या निर्णयानंतर गौतम अदानी यांच्या कंपनीने पण सेलेबी कंपनीसोबतचे सर्व संबंध तोडले. सेलेबीला तिचे सर्व काम अदानी समूहाकडे सोपवण्याचे आदेश मंत्रालयाने दिले आहेत.
चीनला शिकवला धडा…
तुर्कीसह अदानी समूहाने चीनला पण धडा शिकवला. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सने ड्रॅगनपास या कंपनीसोबतचा करार रद्द केला आहे. ड्रॅगनपास ही चीनची एक कंपनी आहे. ही कंपनी एअरपोर्ट लाऊंज आणि ट्रॅव्हल सेवा पुरवते. एअरपोर्ट लाऊंजपर्यंत सेवा देणारी कंपनी ड्रॅगनपास सोबतचे सर्व करारा तात्काळ प्रभावाने संपुष्टात येत असल्याचे घोषणा अदानी समूहाने केली आहे. अदानी यांचे व्यवस्थापन असलेल्या विमानतळावर काही दिवस आता लाऊंज सेवा बंद असेल.
दरम्यान या कारवाईनंतर सेलेबीने स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीचे मते, ती तुर्की कंपनी नाही. या कंपनीचा तुर्कस्तानसोबत कुठलेही राजकीय संबंध नाहीत. कंपनी आंतरराष्ट्रीय मानकांचे पूर्णपणे पालन करते, त्यामुळे भारत सरकारने घेतलेला कठोर निर्णय मागे घ्यावेत अशी विनंती कंपनीने केली आहे.