
मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपल्या ‘X’ खात्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करत ट्वीट केले आहे.
अयोध्या ‘न भूतो न भविष्यती’ सोहळ्यासाठी सज्ज झाली. आज ५०० वर्षांची तपश्चर्या पूर्ण होत आहे. ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन मंगळवार, २३ जानेवारी नाशिकमध्ये होत आहे. या अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सोमवारी नाशिकमध्ये दाखल होत असून, भगूर येथील स्वा. सावरकर यांच्या स्मारकाला ते भेट देणार आहेत. अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ते पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शन व महापूजा करतील. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या ‘X’ खात्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करत म्हटलं आहे,” गर्व से कहो हम हिंदू है”.
जाहिरात


जाहिरात
