कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, गणपती विशेष ट्रेनची एकूण संख्या २९६ …

Spread the love

*मुंबई :* दरवर्षा प्रमाणेच मुंबईतील चाकरमान्यांना आता कोकणातील गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने आधीच २५० गणपती विशेष ट्रेन सोडण्याचे जाहीर केले होते. त्यातच आता या २५० गाड्यांव्यतिरिक्त, मध्य रेल्वे आणखी ४४ गणपती विशेष ट्रेन चालवणार आहे. तसेच, दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनचा विस्तार आणखी २ सेवा वाढवून करणार आहे. येत्या गणपती उत्सवादरम्यान गणपती भक्तांच्या सोयीसाठी आतापर्यंत घोषित झालेल्या एकूण गणपती विशेष ट्रेनची संख्या आता २९६ झाली आहे.

अतिरिक्त ४४ गणपती विशेष ट्रेन-

१. लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेन (एकूण ८ सेवा)

– 01131 द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेन  प्रत्येक गुरुवार आणि रविवार दिनांक २८.८.२०२५, ३१.८.२०२५, ४.९.२०२५ आणि ७.९.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०८.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. (एकूण ४ सेवा)

– 01132 द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेन  प्रत्येक गुरुवार आणि रविवार  दिनांक २८.८.२०२५, ३१.८.२०२५, ४.९.२०२५ आणि ७.९.२०२५ रोजी सावंतवाडी रोड येथून २३.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (एकूण ४ सेवा)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

डब्ब्यांची रचना : २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसन व्यवस्था असलेले गार्ड ब्रेक व्हॅन.

२. दिवा -खेड -दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष (३६ सेवा)

– 01133 मेमू विशेष ट्रेन २२.८.२०२५ ते ८.९.२०२५ पर्यंत दिवा येथून दररोज दुपारी १३.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी २०.०० वाजता खेड येथे पोहोचेल. (एकूण १८ सेवा)

– 01134 मेमू विशेष ट्रेन  २३.८.२०२५ ते ९.९.२०२५ पर्यंत खेड येथून दररोज सकाळी ०८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १३.०० वाजता दिवा येथे पोहोचेल. (एकूण १८ सेवा)

थांबे: निळजे, तळोजा पंचनाद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापेवामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी आणि कळंबणी बुद्रुक.

डब्ब्यांची रचना : ८ कोचची मेमू रेक्स (८ कार मेमू रेक्स)

दिवा– चिपळूण–दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाड्यांचा विस्तार

– 01155/01156 दिवा–चिपळूण–दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या २ अतिरिक्त फेऱ्यांनी विस्तार करण्यात आलेला आहे.  01155 दिवा–चिपळूण विशेषची १ फेरी

– 01156 चिपळूण–दिवा विशेषची १ फेरी वाढवण्यात आली आहे. यामुळे यापूर्वी जाहीर केलेल्या ३८ अनारक्षित विशेष ट्रेनऐवजी आता एकूण ४० अनारक्षित विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत.

अनारक्षित विशेष ट्रेन २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत, ३ ऑगस्टपासून बुकिंग

दिवा–चिपळूण–दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेन आता २२.०८.२०२५ ते १०.०९.२०२५ या कालावधीत चालवण्यात येतील. गणपती विशेष ट्रेन क्रमांक 01131 साठी आरक्षण ३.८.२०२५ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि [www.irctc.co.in](http://www.irctc.co.in) या संकेतस्थळावर सुरू होईल. अनारक्षित कोचचे बुकिंग यूटीएस सिस्टमद्वारे करता येईल आणि सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या अनारक्षित निवासस्थानासाठी सामान्य शुल्क आकारले जाते. विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES APP डाउनलोड करा.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page