
पंचायत राज व ग्रामविकास विभागामार्फत केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणार – गणेश काका जगताप
रत्नागिरी/संगमेश्वर /प्रतिनिधी- ग्रामविकास व पंचायत राज विभाग प्रदेश संयोजक ( अध्यक्ष )महाराष्ट्र गणेश काका जगताप यांचे संगमेश्वर दक्षिण रत्नागिरी जिल्हा मध्ये 26 नोव्हेंबर 2023 रोजी घोळवळकर गुरुजी यांच्या जन्म गावी गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प गोळवली तालुका संगमेश्वर येथे प्रकल्पाला भेट दिली.
प्रकल्पावर पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे जिल्हा संयोजक गणेश पवार यांनी त्यांच्या स्वागत केले. तसेच पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी लोकसभा बूथ संयोजक अनिल घोसाळकर, युवा मोर्चा दक्षिण संगमेश्वर तालुकाध्यक्ष स्वप्नील बापू सुर्वे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस हर्षद काजी, संतोष जाधव, तालुका उपाध्यक्ष अजिंक्य राज सुर्वे, तालुका कार्यकारणी सदस्य मयूर शिंदे, व कार्यकर्ते हे उपस्थित होते.
सदर वेळी संविधान दिवस असल्याने प्रदेशाध्यक्ष गणेश काका जगताप यांनी संविधानाविषयी मार्गदर्शन केले. देशमुख प्रदेश संयोजक यांनी हे संविधान दिवस असल्याने त्या दिवशी मार्गदर्शन केले. सदर वेळी मन की बात कार्यक्रम ही सर्वांनी मिळून पाहिला. मन की बात कार्यक्रमाविषयी प्रदेशाध्यक्षांनी मार्गदर्शन केले.

पंचायतराज व ग्रामविकास विभाग प्रदेश अध्यक्ष गणेश काका जगताप यांनी यावेळी योजनेची पुस्तक के चे जिल्हाध्यक्ष पंचायतराज गणेश पवार यांच्याकडे सुपूर्द केली. सदर वेळेला योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले. भारत विकास यात्रा चे आयोजन केंद्र सरकारने केलेल्या असून त्यामध्ये सहभागी होऊन लोकांपर्यंत योजनेचा लाभ देण्याचे आवाहन पंचायतराजचे प्रदेशाध्यक्ष गणेश काका जगताप यांनी केले.
रत्नागिरी दक्षिण जिल्हा पंचायत राज व ग्रामविकास विभाग कार्यकारणी करण्यासंदर्भामध्येही मार्गदर्शन प्रदेशाध्यक्ष व देशमुख साहेब यांनी केले. लोकांपर्यंत योजना पोचवण्याचे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात यशस्वीपणे करण्याचे आश्वासन यावे गणेश पवार यांनी प्रदेशाध्यक्ष गणेश काका जगताप यांना दिले. रत्नागिरी जिल्हा मध्ये बूथ मधील मधील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवण्याचे काम पंचायत राज व ग्रामविकास विभागामार्फत करण्यात येणार आहे.
पंचायत राज व ग्रामविकास विभागामार्फत केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचवा..
यावेळी गणेश काका जगताप यांनी योजने संदर्भामध्ये कोणतेही अडचण आल्यास ही सोडवण्याची जबाबदारी आपली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये प्रशासनामार्फत ज्या योजनांचे काम चालू आहे ते लोकांपर्यंत पोहोचते पोहोचवताना काही अडचणीला सोडवण्याचे काम आपल्याला करायचे आहे असे यावेळी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन प्रदेशाध्यक्ष गणेश काका जगताप यांनी केले.