
मुंबई- यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर टोलमाफी जाहीर केली आहे. ही सवलत कोकणात जाणाऱ्या सर्व खासगी वाहनांना आणि एसटी बसेसना लागू असणार आहे.

या सवलतीसाठी “गणेशोत्सव 2025-कोकण दर्शन” नावाचे विशेष टोलमाफी पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पासवर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठीही हेच पास वैध राहील. या निर्णयामुळे कोकणातील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवात कोकणात मोठ्या संख्येने जात असतात. या टोलमाफीमुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि खर्चात बचत होणार आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गणेशोत्सवाच्या काळात घेतलेल्या या निर्णयामुळे कोकणातील गणेशभक्तांच्या उत्साहात निश्चितच भर पडणार आहे.
सातारा गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा आत्मा आहे. वर्षभर वाट पाहणारे लाखो गणेशभक्त आपल्या बाप्पाला घेऊन कोकणच्या मातीत परततात. या भाविकांच्या सोयीसाठी राज्य शासनाने यंदा मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या पुढाकाराने 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणार्या तसेच पश्चिम महाराष्ट्रातून जाणार्या मुंबई-बंगळुरू 48 या महामार्गावर टोलफामी देण्यात आली आहे.
मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग 48, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66, सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारितील सर्व महामार्गांवरील टोलनाक्यांवर ही टोलमाफी लागू राहणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससह खाजगी वाहनांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. शासनाने या योजनेसाठी खास ‘गणेशोत्सव 2025’ व ‘कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरूपाचे पथकर माफी पासेस त्यावर गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजसकूर नमूद करून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार संबंधित परिवहन विभाग, वाहतूक पोलिस, आरटीओ यांनी समन्वय साधून पोलिस स्टेशन, वाहतूक पोलिस चौकी व संबंधित आरटीओ ऑफिसेसमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच हे पास परतीच्या प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
” महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस व इतर वाहने महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यातून येणार आहेत, तेथील पोलिस खाते किंवा प्रादेशिक परिवहन खाते यांच्याकडील पासेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संबंधित जिल्ह्यातून गौरी-गणपती उत्सवात वाहतुकीसाठी रवाना होणार्या सर्व बसेसना पथकर माफी असलेले पासेस संबंधित वाहनांना लावून संबंधित बसेस रवाना कराव्या लागणार आहेत. ग्रामीण व शहरी पोलिस व आरटीओ कार्यालयामार्फत दिल्या जाणार्या पासेसची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करावी लागणार आहे. पोलिस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती जनतेस होण्यासाठी आवश्यकतेनुसार त्याची प्रसिद्धी करायची आहे. कोकणात जाणार्या मार्गांवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण, पोलिस आणि परिवहन विभाग एकत्रितपणे काम करणार आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेला आणि सोयीसुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे.”
*गणेशोत्सव हा धार्मिक सोहळा असून तो महाराष्ट्राच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. लाखो गणेशेभक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात कोकणातील प्रत्येक रस्ता भक्तांच्या जयघोषाने दुमदुमणार आहे. शासनाने दिलेली ही टोलमाफी भाविकांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे प्रवास खर्चात व वेळेत बचत होईल आणि बाप्पांच्या दर्शनाचा आनंद अधिक द्विगुणित होईल, अशा प्रतिक्रिया भाविकांकडून व्यक्त होत आहेत.“
“पासेस कसे मिळवायचे?“
‘राज्य शासनाने या योजनेसाठी खास ‘गणेशोत्सव 2025’ व ‘कोकण दर्शन’ असे नाव असलेले पासेस तयार केले आहेत. या पासेसवर वाहन क्रमांक, वाहनमालकाचे नाव आणि प्रवासाच्या तारखा नमूद असतील. पासेस जाणे व परतीचा प्रवास या दोन्हीसाठी ग्राह्य राहतील. हे पासेस संबंधित वाहतूक पोलिस ठाणे, प्रादेशिक परिवहन कार्यलये (आरटीओ) आणि स्थानिक पोलिस ठाण्यांमधून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.“
*गणेशोत्सव हा आपल्या जीवनातला अत्यंत प्रवित्र आणि आनंदाचा क्षण असतो. कोकणात आपल्या बाप्पाला घेऊन जाणार्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ही टोलफामी दिली आहे. टोलमुळे प्रवाशांवरचा आर्थिक भार कमी होईल आणि त्यांचा प्रवास सुलभ व आनंददायी बनेल. भाविकांचा हा सोहळा कोणत्याही अडथळ्याविना पार पडावा ही शासनाची भूमिका आहे. माझ्यासाठी ही टोलमाफी म्हणजे गणेशभक्तांना दिलेली खरी भेट आहे.”
-ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले
मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*