गणपती विसर्जनानिमित्त मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल:कोणते रस्ते असणार बंद? पर्यायी मार्ग कोणते? वाचा सविस्तर….

Spread the love

मुंबई- मुंबईत दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. उद्या, शनिवारी, गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे, त्यामुळे वाहतूक पोलिसांनी शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. 6 सप्टेंबर रोजी गिरगाव चौपाटीवरील स्वराज्य भूमी येथे लालबागचा राजा आणि इतर मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. यासाठी, भायखळा, नागपाडा, काळबादेवी आणि डी.बी. मार्ग वाहतूक विभागातून येणाऱ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहेत.

6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी असल्याने गणेश विसर्जनासाठी दुपारी 12 वाजेपासून दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजेपर्यंत शहरातील महत्त्वाचे रस्ते बंद राहणार आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे. नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी, या काळात जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा, जसे की बेस्ट बस (BEST Bus) आणि लोकल ट्रेन, वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, विसर्जनाच्या दिवशी लोकल ट्रेन तिन्ही मार्गांवर रात्रभर धावणार आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून, 6 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजेपासून 7 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश बंद असेल. या काळात, उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईत जाणाऱ्या किंवा दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईकडे येणाऱ्या वाहनचालकांनी कोस्टल रोड (धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग) वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अटल सेतू आणि फ्री वे वरून दक्षिण मुंबईमार्गे उत्तर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी पी. डिमेलो मार्ग, कल्पना जंक्शन, भाटिया बाग जंक्शन, सीएसएमटी जंक्शन, महापालिका मार्ग, श्यामलदास मार्ग आणि श्यामलदास जंक्शनमार्गे प्रिन्सेस स्ट्रीटवरील कोस्टल रोडच्या उत्तर वाहिनीचा वापर करावा.

त्याचप्रमाणे, उत्तर मुंबईहून दक्षिण मुंबईमार्गे अटल सेतू किंवा फ्री वेकडे जाण्यासाठी वाहनचालकांनी कोस्टल रोडच्या दक्षिण वाहिनीचा वापर करावा. या मार्गात प्रिन्सेस स्ट्रीट, श्यामलदास जंक्शन, श्यामलदास मार्ग, महापालिका मार्ग, सीएसएमटी जंक्शन, भाटिया बाग जंक्शन, कल्पना जंक्शन आणि पुन्हा पी. डिमेलो मार्गे फ्री वे किंवा अटल सेतूवर जाता येईल.

कुलाबा वाहतुक विभागातील बंद असलेले रस्ते…

1. नाथालाल पारेख मार्ग :- भाई बंदरकर चौक (बधवार पार्क जंक्शन) ते सय्यद मोहम्मद जमादार चौक (इंदु क्लिनिक जंक्शन) पर्यंतचा मार्ग वाहतुकीकरीतादोन्ही वाहिन्यांवर बंद राहील.

पर्यायी मार्ग :- भाई बंदरकर चौक (बधवार पार्क जंक्शन) ते सय्यद मोहम्मद जमादार चौक (इंदु क्लिनिक जंक्शन) कडे न जाता सदरची वाहतुक कॅ. प्रकाश पेठे मार्गाने झुलेलाल मंदिर चौक (पांडे लेनजंक्शन) पासून पुढे इच्छित स्थळी जातील.

2. कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग – संत गाडगे महाराज चौक (धनपाल नाका) ते झुलेलाल मंदिर चौक (पांडे लेन जंक्शन)पर्यंत उत्तर वाहिनी वाहतुकीकरीता बंद राहील.

पर्यायी मार्ग :- संत गाडगे महाराज चौक (धनपाल नाका) ते झुलेलाल मंदिर चौक (पांडे लेन जंक्शन)कडे न जाता सदरची वाहतुक साधु टि.एल.वासवानी मार्गाने वर्ल्ड ट्रेड सेंटर, उजवे वळण मेकर टॉवर उजवे वळण जी. डी. सोमानी मार्गाने झुलेलाल मंदिर चौक (पांडे लेन जंक्शन) पासून पुढे इच्छित स्थळी जातील.

मरीन ड्राईव्ह वाहतुक विभागातील बंद असलेले रस्ते

1. नेताजी सुभाषचंद्र बस मार्ग :- नेताजी सुभाषचंद्र बस मार्ग उत्तर संभाजी वाहीनी महाराज वरील सागरी वाहतुक आवश्यकतेनुसार इस्लाम जिमखाना पासुन छत्रपती मार्ग कोस्टल रोड मार्गे वळविण्यात येईल.

आझाद मैदान वाहतूक विभागातील बंद असलेले रस्ते…

1. महानगरपालिका मार्ग – सी.एस. एम. टी जंक्शन ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) पर्यंत वाहतुक (आवश्यकतेनुसार) प्रतिबंधित असेल.

पर्यायी मार्ग :- 6 सप्टेंबर रोजी सदरची वाहतुक ही सी.एस. एम. टी जंक्शन वरून डि. एन रोड एल. टी.मार्गे ते मेट्रो जंक्शन (वासुदेव बळवंत फडके चौक) अशी वळवण्यात येणार आहे.

काळबादेवी वाहतूक विभागातील बंद रस्ते

1. जे. एस. एस. रोड – संगीतकार अब्दुल करीम खान चौक (अल्फ्रेड जंक्शन) ते समतानंद अनंत हरी गद्रे चौक (पोर्तुगीज चर्च) हा रस्ता गरजेनुसार वाहतुकीस बंद राहील.

पर्यायी मार्ग – वाहतुक महर्षी कर्वे मार्ग व एन एस रोड मार्गे वळविण्यात येईल.

2. विठ्ठलभाई पटेल मार्ग कस्तुरबा गांधी चौक (सी पी टॅक सर्कल) ते भगवान श्री चंद्रप्रभा चौक (हॉटेल नित्यानंद जंक्शन) हा रस्ता वाहतुकीस बंद राहील.

पर्यायी मार्ग – वाहतुक काळबादेवी रोड व महर्षी कर्वे मार्गने वळविण्यात येईल.

3. बाबा साहेब जयकर मार्ग – डॉ. चंद्रकला हाटेबाई चौक (घोडागाडी जंक्शन) ते डॉ. यशवंत सामंत चौक (खत्तर गल्ली नाका) दरम्यानची वाहतुक दिनांक ०६/०९/२०२५ रोजी अनंत चतुर्थी दिवशी वाहतुकीस बंद राहील.

पर्यायी मार्ग – वाहतुक काळबादेवी रोड व महर्षी कर्वे मार्गने वळविण्यात येईल.

4. राजा राम मोहन रॉय रोड चारुशीला गुप्ते चौक (चन रोड स्टेशन जंक्शन) ते पदमश्री गोवर्धन बाप्पा चौक (प्रार्थना समाज जंक्शन) हा रस्ता गरजेनुसार वाहतुकीस बंद राहील.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page