संंगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी भवानगड येथील विकासकामांचा प्रश्न भाजपा कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. भवानगड येथील सभामंडप, स्वच्छतागृह, पाखाडी आणि रस्त्याच्या कामासाठी तब्बल ७७.५० लाखाचा भरीव निधी उपलब्ध झाल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी आमदार, सिंधुरत्न समिती सदस्य व लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोदजी जठार यांच्या पुढाकाराने आणि जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत, विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव, नूतन तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, माजी सरचिटणीस डॉ. अमित ताठरे, श्री. अविनाश गुरव, श्री. अविनाश चव्हाण, श्री. नरेंद्र गुरव, श्री. मयुर लिंबुकर, श्री. स्वप्निल पुरोहित आदी मंडळींच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला असल्याने ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.