सतत पाठलाग करायचा, वैतागलेल्या तरुणीने मित्रांना सांगितला किस्सा, आणि छ.शि.टर्मिनल्स येथे घडला भयानक थरार….

Spread the love

मुंबईः मुंबई हे महिलांसाठी सुरक्षित शहर म्हणवले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतही महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमध्येही महिला सुरक्षित नसल्याचं समोर आले आहे. अलीकडेच घडलेल्या दोन घटनांवरुन महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

सीएसएमटी स्थानकात महिलेचा पाठलाग करणाऱ्या एका विकृताला जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महिलेने दाखवलेल्या धाडसामुळं आणि तिच्या मित्रांनी केलेल्या सहकार्यामुळं त्याला पकडण्यात यश आलं आहे. तर, दुसऱ्या एका घटनेत नालासोपारा स्थानकात लोकलमध्ये चढणाऱ्या महिलेची छेड काढल्याचा प्रकार घडला आहे.

सीएसएमटी स्थानकात महिलेचा पाठलाग करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचं नाव जसपाल सिंह असं आहे. तो गेले काही दिवस महिलेवर नजर ठेवून होता. तिच्या येण्या-जाण्याच्या वेळाही त्याने माहिती करुन घेतला होता. महिला बसमधून उतरल्यानंतर लोकल पडकण्यासाठी सीएसएमटी स्थानकाजवळ यायची. त्याचवेळी तिने सिंग याला सीएसएमटी स्थानकाच्या बाहेरील बसस्टॉपजवळ पाहिले. त्यानंतर तिचा पाठलाग करत तो स्थानकातदेखील यायचा. याविषयी घाबरलेल्या महिलेने तिच्या मित्रांना याविषयी माहिती दिली होती.

बुधवारी, सिंग महिलेचा पाठलाग करत असताना तिच्या मित्रांनी पाहिलं. त्यानंतर अचानक त्याने तिला स्पर्श करत विनयभंगाचा प्रयत्न केला. महिलेना प्रसंगावधान राखत आरडा-ओरडा केला. तेव्हा तिथे जवळपास असलेल्या तिच्या मित्रांनी सिंगला पडकले आणि त्याला सीएसएमटी जीआरपी पोस्टवर नेण्यात आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

जाहिरात :

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page