
*मुंबई-* सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उद्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुकर्मांची मालिका सुरू करण्याचा इशारा दिला आहे. अंजली दमानिया गत काही दिवसांपासून सातत्याने गडकरींच्या मुलाच्या कंपनीच्या नफेखोरीवरून त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यातच आता त्यांनी थेट गडकरींच्या कुकर्माची मालिका जाहीर करण्याचा इशारा दिल्यामुळे राज्याच्या राज्यासह देशाच्या राजकारणात मोठी खळबळ माजण्याची चिन्हे आहेत.

अंजली दमानिया यांनी मंगळवारी सकाळी एका ट्विटद्वारे नितीन गडकरी यांचा मुलगा दिवसाकाठी तब्बल 144 कोटी रुपयांनी श्रीमंत होत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या ट्विटची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली होती. तत्पू्र्वी परवा त्यांनी आपण एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार, त्यांनी उद्यापासून आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पोलखोल मालिका सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. उद्या दुपारपासून मी नितीन गडकरी यांच्या विरुद्ध पोल खोल करायला सुरवात करणार आहे. त्यांच्या सगळ्या कुकर्मांची पूर्ण मालिकाच सुरू करणार आहे, असे त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्यात.
*रोहित पवार, सुषमा अंधारेंशी रंगला होता वाद…*
उल्लेखनीय बाब म्हणजे अंजली दमानिया यांचा दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासोबत सोशल मीडियावर वाद रंगला होता. त्यावेळीच त्यांनी आपण एका मोठ्या विषयावर काम करत असल्याचे संकेत दिले होते. सध्या मी एका खूप मोठ्या विषयावर काम करत आहे. त्यामुळे मी रोहित पवार व सुषमा अंधारे यांना विनंती करते की एक आठवडा थांबा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देईन. पण सध्या माझ्याकडे वेळ खरच खूप कमी आहे.

त्या असेही म्हणाल्या होत्या की, महाराष्ट्राच्या दोन विद्वान नेत्यांना माझे आदरपूर्वक उत्तर. माझ्या कृतींबद्दलच्या त्यांच्या समजुतींबद्दल, किंवा माझ्या हेतूंबद्दलच्या त्यांच्या गृहीतकांबद्दल, त्यांच्याशी वाद घालून उपयोग नाही. जे योग्य आहे ते करण्याचे प्रयत्न करावे आणि पुढे जावे. आणि हो, या दोन्ही नेत्यांनी कुठचाच विषय, ना कधी लावून धरला, ना कधी तडीस नेला, असे त्या या दोघांचाही चिमटा काढताना म्हणाल्या होत्या.
*गडकरींचे सुपुत्र दररोज 144 कोटींनी श्रीमंत*
नितीन गडकरींनी काही दिवसांपूर्वीच माझ्या बुद्धीचे मूल्य प्रत्येक महिन्याला 200 कोटी रुपये इतके आहे, असे विधान केले होते. अंजली दमानिया यांनी त्यांच्या या विधानाचा दाखला देत आज म्हणाल्या होत्या की, गडकरी म्हणतात की, त्यांना पैशांची गरज नाही. त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत. त्यांच्या मेंदूचे मूल्य दर महिन्याला 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. खरेतर त्यांनी स्वतःला खूप कमी लेखले आहे. कारण, गडकरींचे सुपुत्र दररोज 144 कोटी रुपयांनी श्रीमंत होत आहेत.

आपल्याला माहिती आहे की, गडकरींच्या मुलाची सियान अॅग्रो नामक कंपनी आहे. 25 जून रोजी सियान अॅग्रोमध्ये 1,89,38,121 प्रमोटर होल्डिंग शेअर्स होते. या शेअरच्या किंमतीत आज 76 रुपयांची वाढ झाली. म्हणजेच एका दिवसात 143.92 कोटी रुपये त्यांनी कमावले. निखील व सारंग गडकरी दिवसाला इतके पैसे कमावत आहेत, असे दमानिया म्हणाल्या.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

