
नवी दिल्ली- सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेला क्षण अखेर आला आहे. सोमवारपासून, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ९०% पेक्षा जास्त जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी जीएसटी कपातीबाबत देशाला संबोधित केले. ते म्हणाले, देशात आता ३७५ हून जास्त वस्तू स्वस्त होतील. यात तूप, चीज, बटर, स्नॅक्स, ड्रायफ्रूट्स आणि आइस्क्रीम यासारख्या दैनंदिन वस्तूंचा समावेश आहे. टीव्ही, एसी, वॉशिंग मशीनसारखी उत्पादनेही स्वस्त होतील. नवीन करप्रणालीअंतर्गत ९९% वस्तू ५% कर स्लॅबमध्ये आल्या आहेत. आता फक्त दोन मुख्य दर असतील : ५% आणि १८%. अति-लक्झरी वस्तूंवर ४०% कर आकारला जाईल. मोदी म्हणाले की या सुधारणा आणि १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर सूट यामुळे नागरिकांना २.५ लाख कोटी रुपयांची बचत होईल. त्यांनी याला “जीएसटी बचत महोत्सव” म्हटले.
प्रत्येक भारतीयाने अभिमानाने सांगावे की तो स्वदेशी खरेदी करतो आणि विकतो : पंतप्रधान
पंतप्रधानांनी सूक्ष्म, लघु व कुटीर उद्योगांना (एमएसएमई) “मेड इन इंडिया”ची हरवलेली प्रतिष्ठा परत मिळवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, भारताची ताकद एकेकाळी स्वदेशी उत्पादनांत होती. प्रत्येक भारतीयाने अभिमानाने सांगण्याची वेळ आली आहे की ते स्वदेशी उत्पादने खरेदी करतात आणि विकतात. परदेशी वस्तूंपासून सावधगिरी बाळगावी. खरेदी करताना उत्पादन स्वदेशी आहे की नाही हे तपासण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले. आता “नागरिक देवो भव” या भावनेने सरकारने सामान्य माणसासाठी दैनंदिन वस्तू स्वस्त केल्या आहेत.
सात प्रश्नोत्तरांतून परिणाम जाणून घ्या…
Q. कमी केलेली किंमत बाजारातील सर्व वस्तूंवर दिसेल का?
नाही. दुकानदारांकडे जुन्या एमआरपीसह वस्तूंचा साठा आहे. त्यामुळे या जुन्या स्टाॅकमधील वस्तूंवर जुनी एमआरपी अजूनही दर्शवली जाईल. केंद्र सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की वस्तूंवर सुधारित किमतीचे स्टिकर लावणे बंधनकारक नाही.
Q. प्रति व्यक्ती सरासरी मासिक बचत किती? हे कधीपासून होईल?
क्रिसिलच्या ताज्या रिपोर्टनुसार, जीएसटीत कपात केल्याने प्रति शहरी रहिवासी सरासरी ₹१,८१९ आणि प्रति ग्रामीण रहिवासी ₹१,१५४ ची मासिक बचत होईल. मासिक खर्चात अंदाजे २७% घट हाेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Q. अशा कोणत्या वस्तू, ज्यावर जीएसटीचे दर घटल्याचा कोणताही परिणाम नाही?
मैदा, तांदूळ, गहू, डाळी, भाज्या, फळे, दूध, दही, ताक, अंडी, मीठ, नैसर्गिक मध आणि पिण्याचे पाणी (पॅक वस्तू). सोने, चांदी, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, स्मार्टफोन, लॅपटॉपवर पूर्वीसारखाच कर कायम राहील.
Q. मला पूर्ण सवलत दिली गेली की नाही हे मला कसे कळेल?
तुम्ही दुकानदाराला विचारू शकता. जर त्यांनी कर भरलेले बिल दिले तर त्यावर नवीन दरांनुसार किमतीवर कर आकारला गेला आहे की नाही हे स्पष्टपणे सूचित केले जाईल. जीएसटीच्या नव्या दरानुसार किंमत कमी झालेल्या वस्तूंची यादी तपासा.
Q. जुन्या स्टॉकची वस्तू खरेदी केल्यास ग्राहकांना जीएसटी कपातीचा लाभ मिळेल का?
हो. ग्राहकांना नव्या दराप्रमाणे पूर्ण लाभ मिळेल. सरकारचे निर्देश आहेत २२ तारखेपासून विकल्या जाणाऱ्या सर्व वस्तू घटलेल्या जीएसटी दरांवर उपलब्ध असतील. दुकानदार जीएसटी रिटर्न भरताना हे समायोजित करतील.
Q. कर तोटा सहन करून सरकारला काय फायदा होतो?
लोकांची क्रयशक्ती वाढेल. महागाई कमी होईल. उद्योगांसाठी कमी खर्चामुळे गुंतवणूक वाढेल, उत्पादन वाढेल, ज्यामुळे अधिक नोकऱ्या निर्माण होतील. वापर वाढून देशाच्या जीडीपीला आगामी काळात चालना मिळण्याची अपेक्षा आहे. प्रति व्यक्ती सरासरी मासिक खर्च २७% पर्यंत कमी, फायदे हळूहळू दिसतील.
Q. जर कोणी जुन्या एमआरपीवर वस्तू विकल्या तर मी काय करावे?
१८००११४००० किंवा १९१५ वर तक्रार करा. ८८००००१९१५ वर एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप पाठवा. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत तक्रारी दाखल करता येतील. नाच आणि उमंग अॅप्सद्वारेदेखील तक्रारी दाखल करता येतील. ट्रॅकिंगदेखील शक्य आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या https://consumerhelpline.gov.in वेबसाइटवर ग्राहक नोंदणी आणि तक्रारी करू शकतात.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

