
चिपळूण, ता. १३ – छत्रपती शिवाजी महाराज ट्रस्ट चिपळूण, संस्थान श्री भार्गवराम परशुराम आणि भ.क.ल. वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र परशुराम मंदिर परिसरात मोफत बहुउद्देशीय वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पावसाळ्यात वाढणारे खोकला, सर्दी, ताप यासारखे संसर्गजन्य आजार, शेतकऱ्यांमध्ये पाय कुजणे व दुखणे, तसेच गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी यांसारख्या हाडांसंबंधी आजारांवर तसेच मधुमेह व रक्तदाब तपासणीसाठी हे शिबिर रविवार, दि. १३ जुलै २०२५ रोजी घेण्यात आले.
या शिबिरात भ.क.ल. वालावलकर रुग्णालय डेरवण येथील डॉ. परमेश्वर पवार, डॉ. सोनम कोतवडेकर, डॉ. उत्तरेश्वर दहिफळे, डॉ. सनिधी भवर, डॉ. महेंद्र भोबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासणी करून आवश्यक त्या औषधांचे मोफत वितरण केले.

या उपक्रमाचा मौजे परशुराम गावातील ५१ ग्रामस्थांनी लाभ घेतला. शिबिर पूर्णतः मोफत असून सामाजिक बांधिलकीतून आयोजित करण्यात आले होते.
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन व समन्वय छत्रपती शिवाजी महाराज ट्रस्टचे सचिव श्री. पृथ्वी पवार, सल्लागार श्री. भाऊ पवार, संस्थान श्री भार्गवराम परशुरामचे व्यवस्थापक श्री. शंकर कानडे व सहव्यवस्थापक श्री. जयदीप जोशी यांनी केले.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर