भाजपा ओ.बी.सी. मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. संतोष जैतापकर यांनी दिली भेट.

जनशक्तीचा दबाव न्यूज | गुहागर | मे १८, २०२३.
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त एस. एस. पी. एम. लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे व स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर आयोजन करण्यात आले होते. या शिबीरासाठी सामाजिक कार्यकर्ते व भाजपा ओबीसी आघाडी उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यावेळी उपस्थित होते.
स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रदीप खेतले यांनी श्री. जैतापकर यांचे स्वागत केले. उल्लेखनीय उपक्रमाच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल संतोष जैतापकर यांनी आयोजकांचे कौतुक केले. सोबतच अशा उपक्रमांना माझे नियमित सहकार्य आणि प्रोत्साहन असेल असा विश्वासही व्यक्त केला.
या शिबिरासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थिती लावली. तसेच स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. श्री. प्रकाश ( बापू ) वीर आणि श्री. सुभाष डिंगणकर यांनी उत्तम पध्दतीने केले. स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रदिप खेतले यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणार्या मान्यवरांचे, उपस्थित लाभार्थींचे आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.