भारतीय जनता पक्षाच्या वतीने ११वी,१२वी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक मार्गदर्शन…

Spread the love

जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष भारती जयंत राजवाडे यांची संकल्पना

महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुजाता साळवी यांच्या शुभारंभ.

▪️ पढेगा भारत तो बढेगा भारत असे म्हणत प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदींचा स्वप्नातील आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी आता प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने कंबर कसली आहे.

▪️देवरुखमधील भाजप च्या महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ.भारती राजवाडे या संकल्पनेचे प्रास्ताविक मांडताना म्हणाल्या की सर्व स्तरातील होतकरू ,गरीब कुटुंबातील ११/१२ वी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना महागडे कोचिंग क्लास परवडत नाहीत ,अशांसाठी व खास करून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तज्ञ शिक्षकांच्या साहाय्याने शैक्षणिक वर्ष २०२३/२४ साठी मोफत ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली सुवर्णसंधी आहे. आणि हे महाअभियान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
या महा अभियानासाठी उत्स्फूर्तपणे विनामूल्य विद्यादानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना यात सामील होता येईल. तसेच सेवानिवृत्त शिक्षक आणि इच्छुक व्यक्ती या अभियानाला हातभार लावू शकतात.या शैक्षणिक प्रशिक्षणासाठी मुंबईतील श्री ऑनलाइन अकॅडमी आपल्याला मदत करत आहे.

▪️ह्या प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ महिला जिल्हा अध्यक्ष सौ .सुजाता साळवी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला, तसेच जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवण्यात आला.

▪️सौ.सुजता साळवी शुभेच्छा देताना म्हणाल्या की गरीब विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देणारा हा उपक्रम जिल्ह्यासाठी एक आदर्श उपक्रम आहे व तळागाळातील विध्यार्थी वर्गाला ह्याचा नक्की फायदा होईल.

▪️या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष सौ सुजाता साळवी; जिल्हा सरचिटणीस संगीता जाधव , युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष अविनाश गुरव , तालुका अध्यक्ष श्री रुपेश कदम ,सौ स्नेहा फाटक, ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष अभिजीत शेट्ये , शहराध्यक्ष सुशांत मुळे, जिल्हा उपाध्यक्ष सौ शीतल पंडित, सरचिटणीस सचिन बांडागळे, भाजप कार्यकर्ते श्री जयंत राजवाडे, जिल्हा सोशल मीडिया संयोजक अमोल गायकर, तालुका क्रीडा सेल अध्यक्ष संदीप वेलवणकर, विशेष निमंत्रक सौ. स्वाती राजवाडे, सौ. स्वाती गोडे , माजी नगराध्यक्ष निलेश भरवणे, सुधीर यशवंतराव , श्री.शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

▪️तळागाळातील विद्यार्थी वर्गाला ह्याचा नक्कीचं फायदा होईल

▪️कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड स्वाती गोडे यांनी केले. आभार शहराध्यक्ष सुशांत मुळे यांनी केले.

संपर्क:-९८६७०५२३४७

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page