डोंबिवली : पोलिस असल्याची बतावणी करत दुचाकी स्वाराला अडवून त्याला अकराशे रुपये दंड वसुल करावा लागेल अशी बतावणी केली. त्यानंतर त्याला पोलिस चौकीत याव लागेल अशी बतावणी करत अर्ध्या रस्त्यात त्याला सोडून त्याची दुचाकी घेऊन दोघे भामटे पसार झाल्याची घटना कल्याणमध्ये घडले.
याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तीन तासात तोतया पोलिस दिलीप पाटील (वय 37) याला बेड्या ठोकल्या आहेत. दिलीप हा पूर्वी उल्हासनगर येथे ट्रॅफिक वॉर्डनचे काम करत असल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे.कल्याण नेतिवली परिसरात राहणारे इंद्रजीत गुप्ता हे फेरिचा व्यवसाय करुन गुरुवारी दुपारी आपल्या दुचाकीवरुन मेट्रो मॉल परिसरातून जात होते. यावेळी दोघांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यातील एकाने इंद्रजीत यांना आपण पोलीस असल्याचे सांगत लायसन्स दाखविण्यास सांगितले
यावेळी गुप्ता यांनी लायसन्स नसल्याचे सांगितल्याने दोघा भामट्यांनी त्यांना तुम्हाला अकराशे रुपये दंड भरावा लागेल. तसेच पोलिस चौकीत यावे लागेल अशी बतावणी केली. यातील एक भामटा इंद्रजित यांच्यासोबत त्यांच्या गाडीवर बसला. इंद्रजित यांना बोलण्यात गुंतवून चक्कीनाका येथील वखारीजवळ आरोपींनी गाडी थांबवत गुप्ता यांना खाली उतरविले. त्यानंतर गाडी घेऊन आरोपी पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचं गुप्ता यांच्या लक्षात येताच, त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.