
देवरुख : दि २४ सप्टेंबर- जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात सोन्याचे व्यापारी धनंजय गोपाळ केतकर (वय ६३, रा. मार्लेश्वर फाटा, देवरुख) यांच्यावर झालेल्या धक्कादायक लुटमारी प्रकरणाचा तपास अवघ्या काही दिवसांत उकलत देवरुख पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. बदलापूर व पनवेल येथे छापे टाकून पोलिसांनी या गुन्ह्यातील चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून स्कॉर्पिओ वाहन, पाच मोबाईल हँडसेट व १ लाख २० हजार रुपये रोख असा मिळून एकूण ६ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक १७ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० ते १०.४५ च्या सुमारास केतकर हे आपल्या मर्सिडिज कार (एमएच-०१-ई-८०१२) मधून घरी जात असताना वांझोळे गावाजवळ पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना आडवले. अनोळखी पाच इसमांनी जबरदस्तीने त्यांना गाडीत बसवून, त्यांच्या गळ्यातील सुमारे १६ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या तीन चैन व खिशातील २० हजार रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली. त्यानंतर त्यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणीची मागणी करत, डोक्यात कठीण वस्तू मारून दरीत टाकून देण्याची धमकी दिली. अखेर १८ सप्टेंबर रोजी रात्री १२.३० च्या सुमारास वाटुळ गावच्या रस्त्यावर त्यांना सोडून देण्यात आले.
केतकर यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावरून गुन्हा क्र. १०४/२०२५ भादंवि कलम ३०९(४), ३१०(१), ३११, १४२(२), १२७(२), ११५(२), ३५१(२) प्रमाणे दाखल करण्यात आला.
घटनेनंतर तातडीने पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी विशेष तपास पथके तयार करून तपासाचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले. तपासादरम्यान पोलिस हवालदार विजय आंबेकर यांनी मिळवलेल्या तांत्रिक व गोपनीय माहितीनुसार आरोपी बदलापूर येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व देवरुख पोलिसांनी संयुक्त कारवाई करून बदलापूरहून दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीतून आणखी दोन आरोपींचा ठावठिकाणा लागून त्यांना पनवेल येथून अटक करण्यात आली.
अटक आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी एक स्कॉर्पिओ वाहन, पाच मोबाईल हँडसेट व १ लाख २० हजार रुपये रोख असा एकूण ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली.
*या मोहिमेत श्रे.पो.उनि. संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आंबेकर यांच्यासह पांडुरंग गोरे, नितीन डोमणे, विनायक राजवैद्य, विक्रम पाटील, गणेश सावंत, योगेश नार्वेकर, प्रविण खांबे, विवेक रसाळ, योगेश शेट्ये, अतुल कांबळे, रमिज शेख, शितल पिंजरे, दत्ता कांबळे, प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, शांताराम झोरे, बाळू पालकर, सत्यजित दरेकर, दिपराज पाटील, अमित कदम, भैरवनाथ सवाईराम, विनोद कदम, निलेश शेलार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.*
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा
आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..
“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

