दापोली तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता

Spread the love

दापोली :- तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ आहे यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी दापोली पोलिसांनी एक पथक नियुक्त केले असून त्यांचा शोध अद्याप सुरू आहे.
२ जुलै रोजी दापोली तालूक्यातील विसापूर गावातील पाथरीकोंड येथील राहत्या घरातून भरत भेलेकर (३४ ) हे दुपारी अडीचच्या सुमारास बेपत्ता झाले .दुसऱ्याच दिवशी ३ जुलै रोजी भरत भेलेकर याची पत्नी सुगंधा भेलेकर ही सकाळी साडेनउच्या सुमारास मुलांना शाळेत सोडायला जाते असे सांगून आराध्य ( ७ ) व श्री (४ ) या आपल्या मुलांना मुगीज शाळा नंबर १ या जिल्हा परिषदेच्या शाळेत घेवून जाते सांगून घरातून निघून गेली तीसुध्दा अद्याप परतलीच नसल्याने मोठी खळबळ उडाली. भरत यांना घरातून निघून जाण्याची सवय आहे . यापूर्वी पण असेच ते बेपत्ता झाले होते पण यावेळी पत्नी व दोन लहान मुले ही बेपत्ता झाल्याने सगळेच नातेवाईक व ग्रामस्थ चिंतेत असून शोधाशोध सुरू आहे.
चुलत भाऊ सहदेव दत्ताराम भेलेकर यांच्यासोबत मंडणगड तालूक्यातील कुंबळे या ठिकाणी लाकडी पट्टी आणणे करीता जात आहे असे सांगून घरातून भरत निघून गेले . ते अदयापपर्यंत घरी आलेले नाहीत . दुकानात जातो असे सांगून निघून गेलेले भरत भेलेकर यांचा कुटूंबासह नातेवाईक – मित्र मंडळीनी सर्वत्र शोध घेवून देखील ते कुठेच न सापल्यामुळे अखेर दापोली पोलिस ठाण्यात भरत भेलेकर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. भरत भेलकर नापत्ता झाल्याच्या नेमके दुस-याच दिवशी ३ जुलै रोजी भरत भेलेकर यांची पत्नी सुगंधा भेलेकर ही सकाळच्या सुमारास मुलांना शाळेत सोडायला जाते असे सांगून घरातून निघून गेली तीसुध्दा परत सायंकाळपर्यंत आपल्या घरी परतली नाही.
आराध्य व श्री या चिमुकल्यांचा तसेच सुगंधा हिचा सगळीकडे शोध घेण्यात आला मात्र ते तिघेही सापडलेले नाहीत तिच्या नातेवाईक व मित्रमंडळींकडेही चौकशी करण्यात आली मात्र त्यांचा कोठेही ठावठिकाणा लागलाच नाही. दूरध्वनीवरही संपर्क केला गेला मात्र संपर्कच होत नसल्यामुळे अखेर सुगंधा भेलेकर बेपत्ता झाल्याची तर आराध्य व श्री या दोघा लहान बालकांचे अपहरण झाल्याची फिर्याद दापोली पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.असुन अज्ञात संशयितांवर भा.द.वि.क. ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळया प्रकरणी घटनेतील प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस फौजदार मिलिंद चव्हाण करत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page