जनशक्तीचा दबाव न्यूज | पालघर | जानेवारी ३१, २०२३.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झालाय. कार आणि बसची धडक होऊन अपघात झाला. कारचालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारनं बसला धडक दिल्यानं हा अपघात झालाय. गुजरातमधून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या या मार्गावर अपघात झाला आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरातमधून मुंबईकडं जाणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघात झालाय. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारची बसला धडक बसली. भरधाव कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं विरुद्ध दिशेनं येणाऱ्या बसला ही कार धडकली. पहाटे पाचच्या दरम्यान ही घटना घडली.
अपघात एवढा भीषण होता की, कारमधील सर्वच्या सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सर्व प्रवाशी गुजरातच्या बारडोलीमधील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर बसमधील तीन प्रवासी अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत.
कासा पोलीस ठाण्याच्या परिसरात आज पहाटे हा अपघात झाला असून कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं गुजरात लेनवर जाऊन गुजरातच्या दिशेनं जाणाऱ्या बसला समोरासमोर धडक दिल्यानं हा अपघात घडला आहे.
यामध्ये मोहम्मद अब्दुल सलाम हाफिसजी (वय ३६), इब्राहिम दाऊद (वय ६०), आसिया बेन कलेक्टर (वय ५७), इस्माईल महंमद देसाय (वय ४२) अशी अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावं आहेत. त्यातील तीन प्रवाशांना अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघात कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महालक्ष्मीजवळ झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू केलं.