
*रत्नागिरी:-* शहरानजीकच्या मिऱ्या-आलावा समुद्रकिनारी मृत व्हेल माशाचे अवशेष आढळून आले आहेत. सुमारे ४२ फुटी हा मासा असून तो पूर्ण सडला आहे. स्थानिक रहिवाशांना मिऱ्या किनारी तीव्र कुजकट वास येत असल्याने त्यांनी किनाऱ्याची पाहणी केली. तेव्हा त्यांना किनाऱ्यावर आक्राळविक्राळ मृत व्हेल माशाचे अवशेष आढळून आले.
वन विभागाच्या कांदळवन क्षेत्रपाल किरण ठाकूर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीवरून घटनास्थळी जाऊन खात्री केली. तेव्हा हा महाकाय व्हेल मासा पूर्ण सडलेल्या अवस्थेत अलावा किनाऱ्यावरील दगडावर असल्याचे आढळून आले. यापूर्वी देखील रत्नागिरी, मालगुंड आणि गणपतीपुळे किनाऱ्यावर अशा प्रकारचे मृत व्हेल मासे आणि त्यांचे अवशेष आढळले होते. वारंवार अशा घटना घडत असल्याने, कोकण किनारपट्टीवरील समुद्री पर्यावरणाचे आणि समुद्री जीवांचे आरोग्य धोक्यात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अलावा येथे आढळलेल्या व्हेल माशाचे सडलेले अवशेष पुरण्यासाठी कांदळवन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ओहोटीची वाट पाहावी लागत आहे. कारण मासा पूर्ण सडल्यामुळे त्याला हलविणे अतिशय कठीण आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

