मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचे निधन…

Spread the love

मुंबई- मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचे आज सोमवारी सकाळी दिर्घ आजाराने निधन झाले आहे. त्या ८५ वर्षाच्या होत्या. डॉ. स्नेहलता यांनी मुंबईत विद्यापीठात कुलगुरू असताना महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. गर्भ संस्कार, नवजात शिशू आणि माता आहार या विषयांवर त्यांनी महत्त्वाचे काम केले आहे.

1995 मध्ये त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक धडाडीचे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर त्या विद्यार्थ्याच्या किंवा विद्यार्थिनीच्या आईचे नावही लिहिणे. गर्भसंस्कार तंत्र आणि मंत्र, तंत्रयुगातील उमलती मने, अरे संस्कार संस्कार इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहले आहेत. तसेच त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना ‘डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार’, ‘धन्वंतरी पुरस्कार’, हे पुरस्कार मिळाले होते. सध्या त्या मुंबईच्या पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या संचालक मंडळ विश्वस्त म्हणून त्या कार्यरत होत्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page