शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी आज भाजपामध्ये केला जाहीर प्रवेश…

Spread the love

१ फेब्रुवारी/मुंबई: कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी आज भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला.

महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा पक्ष प्रवेश शानदारपणे पार पडला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माजी आमदार दळवी यांचे भाजपमध्ये स्वागत केले. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकचे माजी संचालक प्रकाश शिगवण, दापोली पंचायत समिती माजी सभापती शांताराम पवार यांच्यासह दापोलीमधील शिवसेना ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विनय नातू, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, भाजपचे रत्नागिरी उत्तरचे भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे, सतीश धारप, भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकणाच्या विकासासाठी झटणारे नेते सुर्यकांत दळवी आज आमच्यासोबत आले व एका राष्ट्राय प्रवाहामध्ये ते आता सहभागी झाले आहेत. भाजपा हा एक परिवार आहे. कोकणाच्या विकासासाठी तुम्ही जी अनेक वर्षे सकारात्मक प्रयत्न केले, भविष्यातही त्यांच्या सोबत आता संपूर्ण भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे कोकणाचा विकास अधिक जलदगतीने होईल असा विश्वास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page