
ठाणे : देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात ईडीच्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या रोजच ऐकायला येत असतात. पण आता ठाणे महानगर पालिकेतील दिवा या शहरात आलेल्या ईडीच्या बातमीने सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. दिव्यातील माजी लोकप्रतिनिधी नक्की कोण आहे याबाबत नागरिकांमध्ये आता कुजबुज सुरू झाली आहे. राज्यातील नवीन राजकीय घडामोडीं नंतर सगळ्याच माजी लोक प्रतिनिधींचा जीव टांगणीला लागलेला दिसून येत आहे. आपला मतदार आपल्या बाजूला ठेवण्यास धावपळ सुरू आहे.राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका गेल्या एक-दीड वर्षांपासून
लांबणीवर पडल्या आहेत. पण नवीन सरकार आल्यापासून महापालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागतील
अशी परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे आपापल्या मतदारांना खुश ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर वारेमाप खर्च केला जात आहे. केला जाणारा खर्च कोणत्या पैशातून केला जात आहे, त्या उत्पन्नाचा स्रोत आणि इतर आर्थिक बाबींचा तपास आता ईडी करणार असल्याची खात्रीची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.