दिवा (प्रतिनिधी) – दिव्यातील दातिवली गाव येथे श्री गुरुनाथ नाईक (विभागप्रमुख) व सौ.योगिता हेमंत नाईक (महिला उपशहर संघटक ) यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन माजी आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात करण्यात आले.यावेळी दिवा विभागातील ठाकरे गटातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार सुभाष भोईर म्हणाले की,शिवसेनेची शाखा हीच शिवेसनेची ओळख आहे.त्यामुळे शिवसेनेचा विस्तार हा शाखेपासूनच झाला पाहीजे.येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या समस्यांचे निवारण झालेच पाहीजे असे काम करा.आम्ही तुमच्या सोबत सदैव पाठीशी आहोत.यावेळी त्यांनी विभागप्रमुख गुरुनाथ नाईक व योगिता हेमंत नाईक यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभागप्रमुख गुरुनाथ नाईक यांनी केले.यावेळी अनेक महिला व नागरीकांनी शिवसेना शाखेस भेटवस्तू दिल्या.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, दिवा उपशहरप्रमुख सचिन पाटील,श्री अभिषेक ठाकूर,चेतन पाटील,नवनीत पाटील,हेमंत प्रल्हाद नाईक,अक्षय म्हात्रे,शशिकांत कदम,अजित माने,संजय निकम,विलास इंगळे,संजय जाधव व महिला आघाडीच्या विनया कदम,माधुरी नाईक,सुशिला रसाळ,सुनिता अहीरे,कविता उतेकर व ठाकरे गटाचे शेकडो पदाधिकारी,महिला पुरुष युवक युवती ,शिवसैनिक,युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.