

सुभाष बने यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा…
देवरुख: माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल येथे विविध कार्यक्रमांनी आज रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांची माजी आमदार सुभाष बने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती होती.
माजी आमदार डाँ. सुभाष बने यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल येथे सकाळी गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावीच्या परीक्षेत संगमेश्वर तालुक्यात प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी तसेच पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलच्या दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यामध्ये पी. एस. बने स्कूलमध्ये प्रथम आलेली ईला विशाल आंबेकर, द्वितीय- तनिष्का मिनार झगडे, तृतीय क्रमांक प्राप्त सृष्टी दीपक कदम तसेच संगमेश्वर तालुक्यातील सोहम टिळेकर (ठाकरे हायस्कूल), त्रिशा आग्रे ( ठाकरे विद्यालय), आर्या पडये ( माखजन), हर्षवर्धन पाटील (देवरुख), वेदिका आनंद शिवगण, आर्यन तांबट (माखजन) आदी विद्यार्थ्यांसह त्याचप्रमाणे कॅरम क्वीन आकांक्षा उदय कदम हिचा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी माजी आमदार सुभाष बने बोलताना म्हणाले कि, ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासाच्या जोरावर यश संपादन करून आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज करत आहेत. हे पाहून खूप आनंद होत आहे. असेच यश मिळवा, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. असे सांगितले. तर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सोमीनाथ मिटकरी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सत्कार सोहळ्याला माजी आमदार डॉ. सुभाष बने यांचेसह जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, स्मिता सुभाष बने, माजी गटशिक्षणाधिकारी अशोक मोहिरे, सुबोध पेडणेकर, अरुण बने, संजय नाखरेकर आदींसह पालक, शिक्षक वृंद व मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक विनोद निंबाळकर यांनी केले.
यानंतर आंगवली येथील आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाला श्री. सुभाष बने उपस्थिती लावली. तसेच कुंडी येथील कुलदैवत व ग्रामदेवतेचे आशिर्वाद घेतले. बेलारी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बेलारी आदर्श विद्यामंदिर येथे सुभाष बने यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुभाष बने यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सायंकाळी देवरूख तायक्वाँदो क्लबच्यावतीने सुभाष बने यांचा सत्कार करण्यात आला. दुपारी व सायंकाळी तालुक्यातील विविध मान्यवरांनी सुभाष बने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.