शेकाप’ला मोठा धक्का! माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

Spread the love

पनवेल : महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. हा धक्का शेकापच्या माध्यमातून आहे. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या रायगडमधून महाविकास आघाडीला हा धक्का देण्यात आला. ‘शेकाप’चे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी आज भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आणि पाठीराख्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती होती.

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले होते. त्यांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा दारूण पराभव केला होता. या पराभवाच्या धक्क्यातून शेकाप आता कुठे सावरत होता. परंतु त्यापूर्वी भाजपने आणखी धक्का दिला आहे. पेण मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी मंगळवारी भाजपात पक्ष प्रवेश केला आहे.

काय म्हणाले फडणवीस….

आता संघर्ष नाही तर कुटुंब म्हणून काम करायचे आहे. आपल्याकडे सर्वांना त्यांच्या कुवतीप्रमाणे संधी मिळेल. सर्वांना आपण पुढे घेऊन जाऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

तसेच याबद्दल पुढे बोलताना “धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आज एवढा मोठा लोकांचा मेळा जमला, तयार झाला. हे एकप्रकारे कुटुंब तयार झाले. त्यांनी सातत्याने सामान्यांसाठी त्यांनी लढाई केली. मी व ते विरोधी बाकावर बसलो होतो. ते अभ्यासपूर्ण भाषण करायचे. धडाडीने बोलायचे. मी मुख्यमंत्री असताना ते माझ्याकडे यायचे आणि प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करायचो,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Maharashtra Politics)

जाहिरात :

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page