

गेली २५ वर्षे सोन्या-चांदीच्या व्यवसायात असणारे सत्यवान पंडित यांनी नाणीजमध्ये ओंकार ज्वेलर्स या नावाने सोन्या-चांदीचे दालन सुरु केले आहे. माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या शुभ हस्ते फीत कापून या दालनाचा शुभारंभ करण्यात आला. नाणीजसोबतच आजूबाजूच्या अनेक गावांतील लोकांना या दालनाचा फायदा होणार आहे.
या उद्घाटन समारंभाला भाजपचे नेते, माजी आमदार मा. बाळासाहेब माने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. समाजिक कार्यकर्ते श्री. रामभाऊ गराटे, श्री. शेखर साळवी, सरपंच मा. श्री. गौरव संसारे, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. दत्ताराम रावडकर, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन श्री. प्रकाश कांबळे, नरेंद्र महाराज संस्थानाचे सि.ई.ओ. श्री. विनोदजी भागवत, आर.डी.सी. बँक मॅनेजर कारंजारी श्री. सुनिलजी सकपाळ, आर.डी.सी. बँक मॅनेजर पाली श्री. पालशेतकर साहेब, उपसरपंच श्रीम. स्वप्नाली शिंदे, ग्रा.प.सदस्या श्रीम. अनुजा सरफरे, श्रीम. पूजा पंडित, श्री. दत्ताराम शिवगण, श्री. बंड्याशेठ सावंत, श्री. सुधीर कांबळे, श्री. मनोहर संसारे, पि.ए. श्री. गुरव, श्री. विजय गावडे, श्री. विनायक शिवगण आदी मान्यवर उपस्थित होते.