
रत्नागिरी : साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असणार्या गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या सर्व बांधवांना रत्नागिरी विधानसभेचे माजी आमदार बाळासाहेब माने यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, “नवीन वर्षात आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, प्रतापगडाची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता, सह्याद्रीची उंची लाभो हिच शिवचरणी प्रार्थना..!! सर्वांना नववर्षाच्या नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा….!” यावेळी त्यांनी आपल्या शुभेच्छापर संदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा असलेला फोटो समाविष्ट करून शिववंदन केले आहे.
आपल्या शुभेच्छा देताना त्यांनी पुढे नमूद केले की, “महाराष्ट्रातील आद्य राजकुळ म्हणजे शालिवाहन, सातवाहन (ज्यांच्या रथाला सात घोडे आहेत असा तो सूर्य त्याचा वंश) ज्यांनी महाराष्ट्रात जवळपास चारशे वर्षे लोकोत्तर राज्य केले, महाराष्ट्र संस्कृती रूजवली, वृद्धिंगत केली, त्या राजकुळातील मातृसत्ताक पद्धती मानणारा राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने आक्रमक नहपान क्षत्रपाचा कायमस्वरूपी पराभव केला; तो इ.स. ७८ ह्या वर्षी. तो विजय दिवस म्हणून जी कालगणना सुरू झाली, तिला शके असे म्हणतात. चैत्र महिन्यापासून ही कालगणना सुरू झाली. या दिवशी लोकांनी विजयी ध्वजाचे प्रतिक म्हणून गुढी उभारली होती तीच परंपरा आजही कायम आहे.” यामाध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील थोर राज सत्तांचा गौरवशाली इतिहास मांडला. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदीप्यमान इतिहासाशी छेडछाड करून चुकीच्या पद्धतीने हिंदूंच्या या सणाला दूषणे देणार्या समाजकंटकांना सत्य इतिहासाचा संदर्भ देण्याचा प्रयत्न केला आहे.”वीरश्री आणि शौर्याचे प्रतिक असलेल्या गुढीपाडव्याच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छ” असे म्हणत या संदेशाच्या अखेरीस “गुढीपाडवा” असे आवर्जून टॅग करायला विसरले नाहीत.