
मुंबई : आर्थिक घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टानं गुरुवारी फेटाळून लावला. त्यामुळं त्यांना मोठा झटका बसला आहे.वैद्यकीय कारणास्तव आपल्याला जामीन मंजूर व्हावा अशी मागणी त्यांनी जामीन अर्जातून केली होती