रत्नागिरी:- रत्नागिरीच्या राजकारणातील ज्येष्ठ राजकारणी आणि रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मधुकर घोसाळे यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ६७ होते.
मधुकर घोसाळे यांनी तब्बल सहावेळा नगरसेवक पद भुषविले. रत्नागिरी शहराच्या नगराध्य पदाचा कारभार देखील उत्तमरित्या सांभाळला. त्यांच्या पश्चात ४ मुली, जावई, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने रत्नागिरी शहरात शोककळा पसरली आहे. सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवारी सायंकाळी ६ वा. त्यांच्यावर आंबेशेत येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.