रत्नागिरी, ४ सप्टें. (वार्ताहर)- मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला? वार्याने पडला असे म्हणता तर मग वारे पश्चिमेच्या दिशेने वाहत होते आणि पुतळादेखील पश्चिमेलाच कसा पडला? असे सवाल उपस्थित करत माजी खासदार निलेश राणे यांनी पुतळ्याचे राजकारण करणार्यांना जोरदार टोला लगावला आहे. रत्नागिरीमध्ये आयोजित केलेल्या हिंदू एकता सभेमध्ये बोलताना माजी खासदार निलेश राणे यांनी रत्नागिरीमध्ये मावळ्यांच्या पुतळ्यांची जी मोडतोड झाली त्याबाबतही काही प्रश्न उपस्थित करत पोलीस आम्हाला वेडे समाजतात का? असा सवाल करत हा सारा कट आहे अशी शंका उपस्थित करत हिंदू बांधवांनी आता संघटीत झाले पाहिजे, जिथे अन्याय दिसेल तिथे मी तुमच्या पुढे असेन असे आवाहन त्यांनी केले.
मालवण येथील दुर्घटना, रत्नागिरीत झालेली मावळ्यांची तोडफोड आणि ३ महिन्यांपुर्वी घडलेले सर्व प्रकार याविरोधात बुधवारी रत्नागिरीत अंबर हॉल येथे हिंदू एकता सभेचे आयोजन केले होते. या सभेला प्रमुख वक्ते म्हणून माजी खासदार निलेश राणे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर माजी आ. बाळ माने, संजय जोशी, राजेश सावंत, अनघा जैतपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
मालवणच्या दुर्घटनेचा पुतळा पडला की पाडला गेला?…
पुतळा पडला की पाडला? या सभेमध्ये बोलताना मालवणच्या दुर्घटनेचा उल्लेख करत माजी खासदार निलेश राणे यांनी पुतळा पडला की पाडला गेला? असा सवाल करीत पश्चिमेकडून वारे आले आणि पुतळादेखील पश्चिमेलाच कोसळला, हे मी सांगत नाही हे रिपोर्ट सांगतायत, असे सांगितले.
आम्ही रस्त्यावर उतरलो त्यावेळी एका तासात आरोपीला हजर कसं करण्यात आलंं?…
यानंतर रत्नागिरीत झालेल्या मावळ्यांच्या पुतळ्यांच्या तोडफोडीबाबत बोलताना त्यांनी परखड भाष्य केले.माजी खासदार निलेश राणे यांनी अत्यंत आक्रमक असे भाषण केले. ३ महिन्यांपूर्वी याच रत्नागिरीत एका वासराचे मुंडके मिळून आले. त्यानंतर अनेकांनी आपली अक्कल लढवली.पोलिसांनी तर कुत्र्याने वासरू मारले, असा जावईशोध लावला, असा आरोप करीत हा एक कट आहे, असा आरोप करत ज्यावेळी आम्ही रस्त्यावर उतरलो त्यावेळी एका तासात आरोपीला हजर कसं करण्यात आलंं? असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.
आमचा हिंदू मरतोय, गाई-वासरं मरतायत आणि तुम्हाला सलोखा दिसतोय..
बेवडा उंचावर चढला कसा? यावेळी बोलताना निलेश राणे यांनी रत्नागिरीतील मावळ्यांच्या तोडफोड प्रकरणाबाबतही काही प्रश्न उपस्थित केले. मावळ्यांच्या पुतळ्याची मोडतोड बेवड्याने केली असे सांगितले जाते. मारुती मंदिर येथे मी पाहणी करून आलो. एका घोड्यावर एक मावळा बसला आहे. घोड्याची उंची चार ते साडेचार फूट आहे व त्यावर ६ फुटापर्यंत मावळा आहे. ६ फुटावर हा बेवडा गेला कसा? आम्हाला वेडे समजलात का? असा आरोपवजा सवाल त्यांनी यावेळी केला. नाना पाटेकरांना सलोख्याचा भास नुकतेच एका कार्यक्रमासाठी रत्नागिरीत आलेल्या नाना पाटेकर यांनी रत्नागिरीत सलोखा दिसतोय, असे उद्गार काढले होते. नाना पाटेकरांच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी सांगितले की, अरे व्वा! आमचा हिंदू मरतोय, गाई-वासरं मरतायत आणि तुम्हाला सलोखा दिसतोय असा सवाल त्यांनी केला. माझ्याबरोबर चला, सलोखा दाखवतो असा टोलादेखील निलेश राणेंनी नाना पाटेकरांना लगावला.
३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष केला….
त्यांनी माणसं ठेवलीत.. त्यांचे प्लॅन ठरलेले आहेत. त्यांना फक्त ठरलेल्या लोकांनाच पाडायचे आहे. आपण आज संघटीत झालो नाही तर ते घरात घुसतील. मग कोणाची वाट बघणार? ही वाट बघण्याची वेळ नाही… सर्वांनी सजग रहायला पाहिजे, आक्रमक व्हायला पाहिजे, असे ते म्हणाले. म्हणून आडनावे शाबित ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. महाजारांनी संघर्ष केला म्हणूनच आज आपली आडनावं आहेत तशी आहेत. शाबित राहिली आहेत, असे सांगून धर्मांतरावर त्यांनी सूचक इशारा केला. ही वेळ विचार करण्याची नाही तर संघर्ष करण्याची आहे, असे ते म्हणाले. नादाला लागू नका! यावेळी बोलताना निलेश राणे फारच आक्रमक झाले होते. पोलिसांना माझं सांगणं आहे हिंदूंच्या नादाला लागू नका, तोल गेला तर काहीच शिल्लक राहणार नाही, आम्हालाही सर्व अड्डे माहिती आहेत, असे सांगून पोलिसांच्या भूमिकेवरून त्यांनी आगपाखड केली. मी इथे कोणावर आरोप करायला आलो नाही. किंवा ही सभा राजकीय नाही. माझा कोणावर आरोपही नाही. पण तुम्ही कोणाला पोसताय ना? हे लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले. आक्रमक व्हावंच लागेेल! हिंदूंना आता आक्रमक व्हावंच लागेल असं आवाहन करत निलेश राणे फक्त हिंदू धर्माचा सैनिक आहे. मी मतांचा विचार करत नाही. दोन पराभव माझे झाले आहेत. पण माझ्यात बदल झालाय का? असे सांगून निवडणूक आली काय,…