▶️नवी दिल्ली: टीम इंडियाचे माजी खेळाडू सलीम दुराणी यांचे रविवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुजरातच्या जामनगर येथे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ते कर्करोगाने ग्रस्त होते. दुराणी यांच्या निधनामुळे क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.
▶️जन्माने अफगाणी अफगाणिस्तान मधील कबूल येथे जन्मलेले दुराणी प्रथम कराची आणि नंतर भारतात आले. दुराणी आठ महिन्याचे होते तेव्हा त्यांचे कुटुंबीय कराचीला आले. त्यानंतर भारताची फाळणी झाली तेव्हा ते भारतात आले.
▶️६०-७०च्या दशकात दुराणी यांनी अष्ठपैलू म्हणून वेगळी ओळख निर्माण केले. भारतीय संघातील एक शानदार अष्ठपैलू असा त्यांचा उल्लेख केला जातो. १९६०च्या दशकात दुराणी यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराने गौरविण्यात आलेले ते पहिले क्रिकेटपटू होते.