
रत्नागिरी:- छ.शिवाजी महाराज क्रीडांगण येथील रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन माजी क्रिकेटपटू प्रवीण आम्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
▪️”मी राजापूर तालुक्यातील असून कोकणातील खेळाडूंना सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन यावेळी प्रवीण आम्रे यांनी दिले.
▪️पालकमंत्री उदय सामंत व उद्योजक किरण सामंत यांच्या प्रयत्नाने छ.शिवाजी महाराज स्टेडियम चे नूतनीकरण सुरू असून त्याची पाहणी श्री किरण सामंत यांच्या समवेत केली.
▪️यावेळी पदाधिकरी
कार्याध्यक्ष दत्तात्रय साळवी, उपाध्यक्ष दीपक देसाई, सचिव बिपिन बंदरकर, सहसचिव मनोहर गुरव, बलराम कोतवडेकर, सईद मुकादम, निलेश भोसले, दीपक माईन, दीपक सावंत, सुनील घोसाळकर तसेच खेळाडू व कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.