चिपळूण: मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश केलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटातील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा रविवारी चिपळुणात पक्षाचे उपनेते व माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी अनेक तरूणांनी युवा सेनेत प्रवेश केला.
काही दिवसांपूर्वी चिपळूण काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी उपनगराध्यक्ष सुधीरशेठ शिंदे, माजी नगरसेवक करामत मिठागरी, हारून घारे, माजी नगरसेविका सौ. संजीवनी शिगवण, सौ. स्वाती दांडेकर, सौ. संजीवनी घेवडेकर, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष संजय शिगवण व सौ. तृप्ती कदम यांनी शिवसेना पक्षामध्ये नुकताच जाहीर प्रवेश केला. या सर्वांचा शिवसेना चिपळूण यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक नासिरभाई खोत, शशिभाऊ चाळके, राहुल बामणे, अनंत पवार, संदेश आयरे, सौ.सीमाताई चव्हाण, रश्मीताई गोखले, दिलीप चव्हाण, महम्मदभाई फकीर, अभयदादा सहस्रबुद्धे, प्राजक्ता टकले, विनोद पिल्ले, संजय गणवे, लक्ष्मण कदम, रुपेश घाग, आरती महाडिक, सुरैय्या फकीर, सुवर्णा साडविलकर, संगीता हुंबरे, स्नेहा पेवेकर, गायत्री जोशी, दीपक वारोसे, जनार्दन मालवणकर, राकेश देवळेकर, विजय उतेकर, अंकुश आवले, दयानंद जुवळे, रविकांत कदम, फैसल मेमन, सचिन हातीस्कर, सचिन शेटे, अतुल कासेकर, गणेश भालेकर, अनिकेत शिंदे, शुभम कदम यांचेसह शिवसेना चिपळूण पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते. तसेच चिपळूण शहरप्रमुखपदी महम्मदभाई फकीर आणि युवासेना शहरप्रमुखपदी विनोद पिल्ले यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. याबरोबरच या कार्यक्रमात शिवानी शिंदे, मरवा दळवी, अफसा दळवी, मुनझा सरगुरो, कशिश कुसाळकर यांनी युवासेनेमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले.
फोटो- शिवसेनेत पक्ष प्रवेश केलेले माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांचा सत्कार करताना माजी आमदार सदानंद चव्हाण सोबत उद्योजक नासीरभाई खोत व पदाधिकारी, कार्यकर्ते.
जाहिरात :