शुक्रवारी (२० जानेवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आत्माराम चाचे यांनी वर्षा येथे आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी आत्माराम चाचे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या ६ महिन्यात केलेली विकासकामे पाहून मी खूप प्रभावित झालो आहे. आणि यामुळेच मी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात बीएमसीमध्ये आपली सत्ता येईल.’
प्रकाश सुर्वे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांच्या विकासकामांचा मोठ्या प्रमाणात जनतेवर प्रभाव पडत आहे. आणि त्यामुळेच लोक आमच्यात सामील होत आहेत. येत्या काही दिवसांत आणखी बरेच लोक आमच्यासोबत जुडतील.’
नुकतेच एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये लिहिले की, परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील ४० सरपंच, उपसरपंच, अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष व सदस्य, शहराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व पदाधिकारी यांनी आज पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाने १५९३ सरपंच निवडून दिले होते. यामध्ये आणखी ४० जणांची भर पडली आहे. पक्षावरील विश्वास सार्थ ठरवून तालुक्याच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.