रत्नागिरी : सध्या शेतमाला सोबत हजारो रुपयांच्या वस्तू परप्रांतीय व्यापारी फुटपाथवर बसून विकताना दिसत आहेत. यामुळे मोठमोठी दुकाने थाटून कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत अनेकवेळा रत्नागिरी शहर व्यापारी संघाने देखील आवाज उठवला आहे. मात्र तरीदेखील अनेक परप्रांतीय व्यापारी असा माल विकताना दिसत आहेत. आज सकाळीच रत्नागिरी खबरदारने याबाबत आवाज उठवल्यावर रत्नागिरी शहरातील व्यापाऱ्यांनी देखील आपला रोष व्यक्त केला व अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. हि गोष्ट रत्नागिरीचे तेजतर्रार माजी नगरसेवक निमेश नायर यांच्या कानावर पडताच त्यांनी रत्नागिरीतील स्थानिक व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला
नगरपालिकेने कारवाई करीत हजारोंचा माल केला जप्त
व सूत्रे हलवली. शासकीय मनोरुग्णालया समोर हाजारो रुपयांचे फर्निचर विकत असणाऱ्या विक्रेत्याला नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने तत्काळ दणका दिला. आता त्या विक्रेत्याचा माल नगरपालिकेने जप्त केला आहे. अशीच कारवाई नगरपालिकेने सातत्याने सुरु ठेवावी अशी मागणी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने केली आहे.