मुंबई:- लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातील भाजप नेत्यांनी कंबर कसली असून आज मुंबईतील भाजप कार्यालयात २०२४ मधील लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्या बैठकीत भाजपने पुढील रणनीती आखली असून भाजप ३० मे ते ३० जून या कालावधीमध्ये लोकसभा कार्यक्षेत्रांमध्ये महासंपर्क अभियान राबवणार आहे.
२०२४ मध्ये येऊ घातलेली लोकसभेची निवडणूक ही भाजपसाठी महत्वाची असून मोदी सरकार केंद्रात हॅट्रिक करणार आहे.दरम्यान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त खासदार निवडून यावेत यासाठी विविध लोकसभा क्षेत्रात अभ्यासपूर्वक रणनीती आखून त्यानुसार पुढील पावले उचलणार आहे.
तसेच महासंपर्क अभियाना अंतर्गत भाजपा केंद्र सरकारच्या विविध योजना तसेच धोरणं जनतेपर्यंत पोहोचवणार असून याच माध्यमातून मतदारांना आपल्याकडे वळवण्याची भाजपची रणनीती आहे. आज मुंबईमध्येजी बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्यासह भाजपचे बडे नेते उपस्थित होते.