⏩️मुंबई,12 एप्रिल रेल्वेने देशभरात एकूण २१७ स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांना दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, कोलकाता, हैदराबाद आणि चेन्नई सारख्या महानगरातून आपल्या गावी जाण्यासाठी सुविधाजनक होणार आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टी दरम्यान लोकांना प्रवास करताना अडचण येऊ नये यासाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने देशभरात एकूण २१७ स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांना दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, कोलकाता, हैदराबाद आणि चेन्नई सारख्या महानगरातून आपल्या गावी जाण्यासाठी सुविधाजनक होणार आहे.
उत्तर रेल्वे, मध्य रेल्वे विभागासह रेल्वेच्या सर्व विभागाकडून विशेष रेल्वेचे संचालन केले जाणार आहे. सर्वाधिक रेल्वे दक्षिण पश्चिम रेल्वेकडून ६९ स्पेशल ट्रेन धावणार आहेत. त्याचबरोबर दक्षिण मध्य रेल्वेकडूनही ४८ गाड्या धावणार आहे. या २१७ रेल्वे एकूण ४०१० फेऱ्या करणार आहे. रेल्वेकडून यंदाच्या विशेष रेल्वे गाड्यांची लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे, मात्र त्यांची नावे व मार्ग जाहीर केले नाहीत. रेल्वे लवकरच रेल्वे गाड्यांची नावे व त्यांचा मार्ग जाहीर करणार आहे.