
मुंबई : कोकण तसेच इतर भागात गणेशोत्सवसाठी यंदा भारतीय रेल्वेने दरवर्षीच्या तुलनेत ३६७ अधिक फेऱ्या ठरवल्या आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. या निर्णयामुळे उत्सवाच्या काळात प्रवास सुलभ होणार आहे आणि भक्तांना सुविधा मिळणार आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी महाराष्ट्र शासनाने रेल्वे मंत्री आणि भारतीय रेल्वेला पत्राद्वारे मागणी केली होती की, भक्तांच्या प्रवासासाठी अधिक गाड्या उपलब्ध कराव्यात. या मागणीला प्रतिसाद देताना रेल्वे मंत्री यांनी सांगितले की, कोकण तसेच इतर भागात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी दरवर्षीपेक्षा ३६७ जास्त फेऱ्यांचे नियोजन केले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाची माहिती दिली असून, हा निर्णय भक्तांसाठी सुविधाजनक ठरणार आहे. यामुळे उत्सव काळात प्रवास अधिक सुरळीत होईल आणि भक्तांना प्रवासात अडथळा येणार नाही.

मुंबईत राहणारे अनेक कोकणवासी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने आपल्या मुळगावी कोकणात परततात. याशिवाय, राज्याच्या इतर भागातील नागरिक देखील या सणासाठी प्रवास करतात. यंदा भारतीय रेल्वेने उपलब्ध करून दिलेल्या जादा ३६७ फेऱ्यांमुळे प्रवाशांना मोठी सोय होणार आहे. राज्यातील गणेशभक्तांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो गणेशभक्तांना प्रवासाचा त्रास कमी होणार असून त्यांचे आभार मानण्यासारखे आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*