थार कारचा थरार! रिक्षाला दिलेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू, चिपळूणमधील भीषण दुर्घटना…

Spread the love

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन त्यांना चिपळूण येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले आहे….

चिपळूण प्रतिनिधी- चिपळूण-कराड महामार्गावर पिंपळी गावाजवळ मंगळवारी रात्री उशीरा एक हृदयद्रावक अपघात घडला. वेगाने येणाऱ्या एका थार जीपने समोरून येणाऱ्या रिक्षाला इतकी जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या धडकेत रिक्षातील चार प्रवासी आणि थार जीपचा चालक, असे एकूण 5 जण जागीच ठार झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, थार गाडी अतिशय वेगाने येत होती आणि तिचा वेग इतका जास्त होता की चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी, गाडीने रिक्षाला धडक दिली. धडकेनंतर थार गाडी पुन्हा एका ट्रकला जाऊन धडकल्याचेही सांगितले जात आहे. अपघातात ठार झालेले सर्व 5 जण पुरुष आहेत. मृतांमध्ये पिंपळी नुराणी मोहल्ला येथील 4 नागरिकांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच, चिपळूणचे डीवायएसपी आणि पोलीस निरीक्षक त्यांच्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन त्यांना चिपळूण येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले आहे.

या अपघातामागे नेमके काय कारण होते, थार चालक कोणत्या दिशेने आणि कोणत्या उद्देशाने प्रवास करत होता, याचा तपास पोलीस करत आहेत. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली. एकाच गावातील चार नागरिकांचा अपघाती मृत्यू झाल्याने पिंपळी गावात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

३ वाहनांचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू…

चिपळूण-कराड मार्गावरील वाशिष्टी डेअरीजवळ पिंपळी कॅनॉलवर सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ट्रक, थार गाडी आणि रिक्षा अशा ३ वाहनाच्या झालेल्या अपघातात ५  जणांचा जागीच मृत्यू झाला. 
     

पिंपळी येथील मदरश्यात एका लहान मुलाला सोडण्यासाठी एक कुटुंब रिक्षाने येत होते. काळकाई मंदिर येथे ही रिक्षा आली. त्याच मागावून एक अती वेगाने थार गाडी येत होती. थार वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने रिक्षाला उडवले. रिक्षा समोरून येणाऱ्या आयशर ट्रकवर आदळली. रिक्षात असलेले चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर थार चालकही या अपघातात मृत झाला, असल्याची माहिती मिळत आहे.  या अपघातातील रिक्षाचालक इब्राहिम लोणे हे स्थानिक पिंपळी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. तर थार गाडी हरियाणा पासिंग असून या अपघातातील मृतांना कामथे रुग्णालयात हलविण्यात आले.
      

या अपघातात शबाना मियां सय्यद वय ५० , हैदर नियाज सय्यद ३ वर्ष ८ महिने, नियाज हुसेन सय्यद वय ५० , रिक्षा चालक इब्राहिम इस्माईल लोणे वय ६० , या चौघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. हे चारहीजण पिंपळी मोहल्ला येथील आहेत. यामध्ये रिक्षा चालक वगळता कुटुंबातील तिघांचाही समावेश असून आई-वडील व मुलगा या तिघांचाही दुर्दैवीरित्या जागीच मृत्यू झाला आहे. थार गाडी चालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page