‘प्ले स्टोअर’वरील पाच लोन अ‍ॅप हटवले; सायबर पोलिसांची कारवाई…

Spread the love

पिंपरी : विद्यार्थ्यांसह नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अनधिकृत लोन अ‍ॅपविरोधात पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुगल प्ले स्टोअरवरून पाच लोन अ‍ॅप हटवण्यात पोलिसांना यश आले असून यामुळे नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळले आहे.

गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीच्या अ‍ॅप्सविषयी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी येत होत्या. या प्रकरणात गुन्ह्यांचे मूळ स्रोत गुगल प्‍ले स्‍टोअर वरील अ‍ॅप असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांकडून चौकशी केल्यानंतर या अ‍ॅपकडे आरबीआय, सेबीची अधिकृत परवानगी असल्याचे आढळून आले. पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व सहायक निरीक्षक प्रविण स्वामी यांनी गुगलशी सातत्याने संपर्क साधून ‘क्रेडिट लेन्स’, ‘रॅकप्म्टा’, ‘आरपीएमटीए’, ‘क्रेडिट पायलट’ आणि ‘रेबा रोख’ हे पाच अ‍ॅप हटवले आहेत. याशिवाय ‘कीक्रेडिट’, ‘एससी एलिट व्हीआयपी’, ‘लुमेनमॅक्‍स’, ‘रूपांतरण’ या अ‍ॅप बंद करण्यासाठी देखील पत्रव्यवहार सुरू आहे.

नागरिकांनी कोणतेही लोन अ‍ॅप वापरण्यापूर्वी ते आरबीआय अथवा सेबीकडे नोंदणीकृत आहे की नाही, याची खात्री करूनच वापर करावा, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनायक चौबे, सह आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आव्हाड, उपायुक्त संदीप डोईफोडे, डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस अंमलदार दिपक भोसले, वैशाली बर्गे, नितेश बिचेवार, स्वप्निल खणसे, स्मिता पाटील यांचा समावेश होता.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page