चिपळूण येथील कापसाळ येथे तिहेरी अपघात ; पाच जखमी

Spread the love

चिपळूण :- मुंबई – गोवा महामार्गावर कापसाळ येथे मोरे यांच्या सॉ मिलसमोर रविवारी दुपारी बोलेरे पिकअप , दुचाकी व इनोव्हा कारची समोरासमोर टक्कर झाली . या भीषण अपघातात पाच जण जखमी झाले आहेत .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर उमासरे ( रा . दळवटणे ) हा तरुण गंभीर जखमी झाला . या अपघातात तिन्ही वाहनांचे नुकसान झाले . मुंबई – गोवा महामार्गावर कापसाळ – मोरेवाडी येथे दुचाकीस्वार रस्ता ओलांडत होता . त्यावेळी समोरून वेगाने चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअपच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने दुचाकी आणि इनोव्हा कारला जोरदार धडक दिली . इनोव्हातील श्रुतिका दिलीप गांगण ( वय ५३ , रा . माहीम , मुंबई ) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली . त्या लांजाहून मुंबईकडे निघाल्या होत्या . पिकअपमधून चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चेतक कंपनीचे कामगार प्रवास करत होते . त्यातील तिघेजण जखमी झाले आहेत . सर्व जखमींना लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page