
नवी मुंबई : डिजिटल पद्धतीने पहिले सत्र न्यायालय महाराष्ट्रमध्ये आता नवी मुंबई जवळील बेलापूर या ठिकाणी सुरू होत आहे. महाराष्ट्र शासनाने दोन सत्र न्यायालयांना मंजुरी दिल्यामुळे आता बेलापूर या ठिकाणी डिजिटल सत्र न्यायालय सुरू होत आहे. 2017 या कालावधीमध्ये याबाबतचे उद्घाटन देखील झाले होते. यामुळे ठाणे सत्र न्यायालयात खटल्यांचा भार आता कमी होणार आहे.
न्यायाधीशांचा वेळ आणि त्रास वाचणार : बेलापूर आणि नवी मुंबई या ठिकाणी असंख्य खटले सत्र न्यायालयामध्ये येतात. तसेच दिवाणी न्यायालयामध्येदेखील येतात. मात्र डिजिटल सत्र न्यायालय सुरू होत असल्यामुळे ठाण्याला जाण्याचा त्रास आता कमी होणार आहे. अनेक प्रकरणे हे ठाण्याच्या जिल्हा न्यायालयामध्ये नेल्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र या ठिकाणी डिजिटल सत्र न्यायालयामुळे जनतेचा वकिलांचा आणि न्यायाधीशांचा वेळ आणि त्रास वाचणार आहे.