भाजपाच्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट, वाचा संपूर्ण यादी…

Spread the love

भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण पश्चिम नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार या दिग्गज नेत्यांची नाव पहिल्या यादीत आहेत.

भाजपाची पहिली यादी (BJP) कुणाला मिळाली संधी? :

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठीतून, मंत्री गिरीश महाजन जामनेरमधून, मंत्री सुधीर मुनगंटीवार बल्लारपूरमधून, श्रीजया अशोक चव्हाण भोकरमधून, आशिष शेलार वांद्रे पश्चिममधून, मंगल प्रभात लोढा मलबार हिलमधून निवडणूक लढवणार आहेत. कुलाब्यातून राहुल नार्वेकर, साताऱ्यातून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले निवडणूक लढवणार आहेत.

भाजपाची पहिली यादी (BJP) अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट :

गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. आता भाजपानं एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपानं आपल्या पहिल्या यादीत समावेश केलाय. या यादीत काही खास नावं आहेत. भाजपानं अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. श्रीजया या भोकर या मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनादेखील भाजपानं तिकीट दिलं आहे. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील.

भाजपाची पहिली यादी (BJP) दिग्गजांना संधी :

नागपूर पूर्वमधून कृष्ण खोपडे, विजय रहांगडाले तिरोरातून, विनोद अग्रवाल गोंदियामधून, संजय पुरम अमगांवमधून, कृष्णा गजबे आर्मोलीमधून निवडणूक लढवणार आहेत. बंटी भांगडिया चिमूरमधून, संजीवरेड्डी बोडकुरवार वाणीमधून , अशोक उडके रालेगावमधून, मदन येरवर यवतमाळमधून, भीमराव केरम किनवटमधून, राजेश पवार नायगावमधून, तुषार राठोड मुखेडमधून निवडणूक लढवणार आहेत.

भाजपाची पहिली यादी (BJP) 99 उमेदवारांची संपूर्ण यादी-

नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस

कामठी -चंद्रशेखर बावनकुळे

शहादा – राजेश पाडवी

नंदूरबार- विजयकुमार गावीत

धुळे शहर -अनुप अग्रवाल

सिंदखेडा – जयकुमार रावल

शिरपूर – काशीराम पावरा

रावेर – अमोल जावले

भुसावळ – संजय सावकारे

जळगाव शहर – सुरेश भोळे

चाळीसगाव – मंगेश चव्हाण

जामनेर -गिरीश महाजन

चिखली -श्वेता महाले

खामगाव – आकाश फुंडकर

जळगाव (जामोद) – संजय कुटे

अकोला पूर्व – रणधीर सावरकर

धामगाव रेल्वे – प्रताप अडसद

अचलपूर – प्रवीण तायडे

देवली – राजेश बकाने

हिंगणघाट – समीर कुणावार

वर्धा – पंकज भोयर

हिंगना – समीर मेघे

नागपूर दक्षिण – मोहन माते

नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे

तिरोरा – विजय रहांगडाले

गोंदिया – विनोद अग्रवाल

अमगांव – संजय पुरम

आर्मोली – कृष्णा गजबे

बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार

चिमूर – बंटी भांगडिया

वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार

रालेगाव – अशोक उडके

यवतमाळ – मदन येरवर

किनवट – भीमराव केरम

भोकर – क्षीजया चव्हाण

नायगाव – राजेश पवार

मुखेड – तुषार राठोड

हिंगोली – तानाजी मुटकुले

जिंतूर – मेघना बोर्डीकर

परतूर – बबनराव लोणीकर

बदनापूर -नारायण कुचे

भोकरदन -संतोष दानवे

फुलंब्री – अनुराधा चव्हाण

औरंगाबाद पूर्व – अतुल सावे

गंगापूर – प्रशांत बंब

बगलान – दिलीप बोरसे

चंदवड – राहुल अहेर

नाशिक पुर्व – राहुल ढिकाले

नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे

नालासोपारा – राजन नाईक

भिवंडी पश्चिम – महेश चौघुले

मुरबाड – किसन कथोरे

कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड

डोंबिवली – रवींद्र चव्हाण

ठाणे – संजय केळकर

ऐरोली – गणेश नाईक

बेलापूर – मंदा म्हात्रे

दहिसर – मनीषा चौधरी

मुलुंड – मिहिर कोटेचा

कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर

चारकोप – योगेश सागर

मालाड पश्चिम – विनोद शेलार

गोरेगाव – विद्या ठाकूर

अंधेरी पश्चिम – अमित साटम

विले पार्ले – पराग अलवणी

घाटकोपर पश्चिम – राम कदम

वांद्रे पश्चिम – आशिष शेलार

सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन

वडाळा – कालिदास कोळंबकर

मलबार हिल – मंगलप्रभात लोढा

कुलाबा – राहुल नार्वेकर

पनवेल – प्रशांत ठाकूर

उरन – महेश बाल्दी

दौंड- राहुल कुल

चिंचवड – शंकर जगताप

भोसली -महेश लांडगे

शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले

कोथरुड – चंद्रकांत पाटील

पर्वती – माधुरी मिसाळ

शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील

शेवगाव – मोनिका राजले

राहुरी शिवाजीराव कर्डिले

श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते

कर्जत जामखेड – राम शिंदे

केज – नमिता मुंदडा

निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर

औसा – अभिमन्यू पवार

तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील

सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख

अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी

सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख

मान -जयकुमार गोरे

कराड दक्षिण – अतुल भोसले

सातारा – शिवेंद्रराजे भोसले

कणकवली – नितेश राणे

कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक

इचलकरंजी – राहुल आवाडे

मिरज – सुरेश खाडे

सांगली – सुधीर गाडगीळ

उमेदवारांची यादी जाहीर करण्यात भाजपानं आघाडी घेतली आहे. महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच भाजपानं पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page