रेल्वे स्थानकांना जंक्शन आणि टर्मिनल्स नावे कशामुळे पडली; पहा सविस्तर….

Spread the love

जंक्शन म्हणजे काय

रेल्वेच्या परिभाषेत जंक्शन  (Junction) अशा स्थानकाला संबोधतात जेथून दोन हून अधिक ठिकाणी जाणारे मार्ग निघत असतात. सोप्या भाषेत एका जंक्शनमध्ये एका ट्रेनसाठी कमीत कमी तीन मार्ग तयार केलेले असतात. ज्यामधून एका मार्गाने ट्रेन येते आणि उर्वरित दोन मार्गापैकी ती ट्रेन तिच्या ठरलेल्या मार्गाने बाहेर पडते. त्यामुळे रेल्वेच्या ट्रॅफिकचा गुंताही सुटण्यास मदत होत असते. देशातील सर्वात जास्त मार्ग असणारे जंक्शन मथुरा जंक्शन आहे. येथून तब्बल सात मार्ग बाहेर पडतात. आहे की नाही चमत्कारीक रेल्वेचे जाळे

टर्मिनल आणि टर्मिनस मधील फरक

रेल्वेच्या शब्दकोषात टर्मिनल आणि टर्मिनस काही वेगवेगळा अर्थ नसून दोन्ही शब्दांचा अर्थ एकसारखाच असतो असे म्हटले जात आहे. खरे तर रेल्वे टर्मिनलचा अर्थ शेवटचे स्टेशन अशा अर्थाने घेतला जातो. जेथून ट्रेन पुढे जात नाही त्याला टर्मिनल म्हटले जाते. देशातील काही टर्मिनल किंवा टर्मिनसचा विचार केला तर मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) आणि दिल्लीच्या (Anand Vihar Terminal )आनंद विहार टर्मिनल यांचा यात समावेश आहे.

सेंट्रल कशाला म्हणतात..

रेल्वे स्थानकाच्या नावानंतर सेंट्रल असे नावानंतर लिहीले असेल तर त्याचाही वेगळा अर्थ आहे. जर कोणत्या रेल्वे स्थानकाला सेंट्रल असे म्हटले जात असेल तर ते स्थानक शहरातील सर्वात मुख्य आणि जुने रेल्वे स्थानक आहे. या स्थानकात एकाच वेळा अनेक ट्रेन प्रवेश करीत असतात. सेंट्रल स्टेशन अशाच शहरात तयार केले जाते, जेथे अन्य रेल्वे स्थानकेही असतात. सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या मदतीने मोठ्या शहरांना एकमेकांनी जोडले जाते. देशातील काही प्रमुख सेंट्रल रेल्वे स्थानकांचे उदाहरण द्यायची असतील तर मुंबई सेंट्रल आणि कानपूर सेंट्रल यांची नावे वानगी दाखल आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page