प्रवासी विमान कंपनीकडून कोणत्या गोष्टींची मागणी करू शकतो. याबाबत जाणून घ्या, जेणेकरुन वेळ आल्यावर प्रवासी या अधिकारांचा लाभ घेऊ शकेल. 2019 मध्ये नागरी उड्डयन मंत्रालयाने या संदर्भात एक चार्टर जारी केला होता, त्यात काय म्हटले आहे ते पाहूया…. डीजीसीएच्या म्हणण्यानुसार, एखाद्या विमानाला 6 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास, प्रवाशांना 24 तास आधी पुनर्निर्धारित वेळेची माहिती द्यावी लागेल. तसेच प्रवासी एवढा वेळ थांबायला तयार नसतील तर त्यांना दुसऱ्या विमानामध्ये पाठवावे किंवा संपूर्ण पैसे परत करावेत.