ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष रोशन भगत यांच्या पाठपुराव्याला यश
दिवा (प्रतिनिधी ) दिवा शहरातील मुंब्रा देवी कालनी रोडसह दातिवली चौक ते सेंट मेरी स्कूल पर्यंत रस्तावर इतरत्र पडलेल्या विद्युत भारित वायर अखेर टोरंट कंपनीकडून अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरु केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.या वायर धोकादायक बनल्या असल्याचे निवेदन भाजपा ओबीसी मोर्चाचे दिवा अध्यक्ष श्री रोशन भगत यांनी टोरंट कंपनीकडे निवेदन देत कळविले होते.अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे.
गेली कित्येक दिवस मुंब्रा देवी कॉलिनी रोड ( दातिवली चौक ते सेंड मेरे स्कूल पर्यंत) रस्त्यावरती असलेल्या एस टी व एल टी लाईन्स चा नाहक त्रास सामान्य नागरिकांना होत होता. विद्युत लाईन वरती लोड आल्याकारणाने लाईन्स वारंवार तुटत होत्या. पावसाळ्यामध्ये ही वायर तुटून दुर्घटना होत होत्या. सदर दुर्घटनेत जीवितहानी होण्याची ही शक्यता होती. ही बाब ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत यांच्या निदर्शनास तेथील स्थानिक रहिवाशांनी आणून दिली होती. सदर गोष्टीची माहिती मिळताच रोशन भगत यांनी तत्काल टोरंट अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून या समसस्या निवरान करण्याची विनंती केली. सततच्या पाठपुराव्यानंतर टोरंट अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालून या समस्येवरती उपाय म्हणून सदर रस्त्यावरील एसटी व एलटी विद्युत लाईन अंडरग्राउंड करण्याचे कामास सुरुवात केली आहे.
रोशन भगत यांच्या पाठपुराव्याने सदर लाईनचे काम झाल्यामुळे तेथील स्थानिक रहिवाशांनी रोशन भगत यांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर कर्तव्यदक्ष टोरंटच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.हे निवदेन सादर करण्यासाठी भाजपा अध्यक्ष दीवा मंडळ रोहिदास मुंडे, सरचिटणीस श्री समिर चव्हाण, युवा मोर्चा सचिन भोईर,व्यापारी अध्यक्ष श्री जयदीप भोईर, सौ सपना भगत आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.