दिवा : दिव्यातील कोकणरत्न परिसरातील नैसगिर्क प्रवाह बुजवल्याने पावसात येथील चाळींमध्ये पाणी भरू नये म्हणून तो प्रवाह पूर्ववत करण्याची मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सहाय्यक आयुक्तांना केली होती. पण सार्वजनिक बांधकाम विभाग, स्वच्छता विभाग आणि अतिक्रमण विभाग यांच्या कडून गेले दोन-अडीज महिने फक्त जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचे काम सुरू होते. अखेर आज पाऊस सुरू झाल्यानंतर रात्री ९.०० च्या सुमारास इथल्या चाळींमध्ये पाणी भरण्यास सुरवात झाली.
त्यानंतर सहाय्यक आयुक्त, स्वच्छता निरीक्षक, आणि अतिक्रमण विभाग यांना कॉल करून ” आता चाळींमध्ये पाणी भरल्याची जबाबदारी कोणाची ?” असा जाब विचारल्यानंतर तात्काळ रात्री १०.१५ वाजता आपत्कालीन विभागाकडून जेसीबी आणि महापालिकेचे कामगार पाठवण्यात आले. इतके महिने कागदी घोडे नाचवणारे आणि एकमेकांवर जबाबदारी ढकलणारे स्वतः उपस्थित नसून केवळ फोन वरून आदेश देऊन पाण्याचा प्रवाह खुला करण्यास सांगत होते. फक्त आणि फक्त जाणूनबुजून हे काम महापालिकेचे अधिकारी टाळत होते हेच यावरून दिसुन येते. पण सोमवारी मनसे दिवा शहरअध्यक्ष श्री.तुषार भास्कर पाटील यांच्या नैतृत्वाखाली मनसे सहाय्यक आयुक्तांना याचा जाब नक्की विचारेल.
अखेर रात्री ११.४५ ला हा प्रवाह खुला करण्यात आल्यानंतर येथील नागरिकांनी दिवा मनसेच्या टिमचे आभार मानले.
जाहिरात