अखेर सावंतवाडीतील तो बॅनर हटवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची तातडीने कारवाई….

Spread the love

*सावंतवाडी प्रतिनिधी: –* दहशतवाद असाच संपवावा लागतो अशा आशयाचा बॅनर सावंतवाडीत लावला होता. हा बॅनर सावंतवाडी नगरपरिषदेकडून काढण्यात आला. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रथमच ही कारवाई आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर हिंदुत्ववादी संघटनांकडून लावला होता. मोती तलाव शिव उद्यान शेजारी हा बॅनर लावण्यात आला होता. अफझलखान वधाच चित्र अन् ४०० वर्षापूर्वी आपल्या शंभूराजेंना धर्म बदलला नाही म्हणून मारले आणि आज ही २७ लोकांना धर्म विचारुनच मारले. काहीच बदलले नाही. म्हणून, तुम्ही किमान नाव विचारूनच खरेदी करा. १००% आर्थिक बहिष्कार असा आशय बॅनरवर होता. विश्व हिंदू परिषद, बजरंगदल, हिंदू जागरण मंच सकल हिंदू समाज, सिंधुदुर्ग यांच्याकडून लावण्यात आला होता. आज सायंकाळी यांवर न.प. प्रशासनाकडून करण्यात आली. आजच शहर आणि मोती तलावाच्या सौंदर्याला बाधा येईल असे बॅनर्स, होर्डिंग्ज, फ्लेक्स, पोस्टर्स लावल्यास कारवाई करण्यात येईल, प्रिंटर्सनी नगरपरिषदेच्या परवानगी शिवाय ते बनवून देऊ नये असे निर्देश मुख्याधिकारी सौ. अश्विनी पाटील यांनी दिले. सावंतवाडी शहरातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटना कार्यकर्ते आणि प्रिंटर्स व प्रकाशकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्याधिकारी अश्विनी पाटील, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page